नितेश राठोड यांची युवा मोर्चा तालुका अध्यक्षपदी निवड कार्यकर्त्यांकडून जल्लोषात सत्कार
प्रतिनिधी. अंबादास मुकटे माहूर
माहूर : भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा माहूर तालुका अध्यक्षपदी नितेश सदाशिव राठोड यांची निवड झाल्याबद्दल माहूर शहरातील भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष करत त्यांचा भव्य सत्कार केला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला.
नितेश राठोड यांच्या निवडीमुळे युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी तसेच युवकांना पक्षाच्या विचारधारेसोबत जोडण्यासाठी ते प्रभावीपणे काम करतील, असा विश्वास उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
यावेळी नगरसेवक तथा भाजपा शहराध्यक्ष गोपू महामुने, ज्येष्ठ पत्रकार.विजय आमले, नंदकुमार जोशी, बातमी सम्राट चे प्रतिनिधी अंबादास मुकटे, शंकर भालेराव
मराठी बाणा वार्ता प्रतिनिधी आदित्य खंदारे,
शिवसेना तालुका संघटक विनोद पाटील सूर्यवंशी, निलेश तायडे, पवन चव्हाण, कैलास फड, गौतम मेहता, पवन शर्मा, योगेश परसवाळे, निसर्ग राठोड, तुषार डोंगरे, प्रभास जाधव, मुदसिर सौदागर, बालाजी गेंटलवार, विकी कांबळे, कमलेश जोगदंड, सोनू कांबळे, अनिकेत वाघमारे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व मित्रमंडळी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांनी नितेश राठोड यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. निवडीनंतर कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.








