मटका जुगारावर शिवाजीनगर पोलिस व परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत पांढरे यांच्या संयुक्त पथकाचा छापा; १ लाख २३ हजारांचा मुद्देमाल जप्त
कुलदीप गायकवाड ( बीड जिल्हा प्रतिनिधी )
दि. ०९ सप्टेंबर २०२६ : बीड जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कावत यांनी सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांना अवैध धंद्यांवर छापे टाकून प्रभावी कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सूचनांच्या अनुषंगाने शिवाजीनगर पोलिसांकडून अवैध धंद्यांविरुद्ध सातत्याने कारवाई करण्यात येत आहे.
परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री. भारत पांढरे व पोलीस निरीक्षक श्री. शितलकुमार बल्लाळ हे पोलीस अंमलदार पोह/१६६४ रवींद्र आघाव व पोशि/२७३ नवनाथ डाके, पोशी/995 अक्षय लोंढे
चापोशी/1982 योगेश निर्धार यांच्यासह गस्त करत असताना, पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांना गोपनीय बातमीदारामार्फत कॅनाल रोड, नगर नाका, बीड येथे एक इसम स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आकड्यांवर पैसे लावून विनापरवाना बेकायदेशीररीत्या कल्याण नावाचा मटका जुगार खेळत व खेळवीत असल्याची माहिती मिळाली.
माहितीची खात्री करून शिवाजीनगर पोलीस स्टेशन व परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत पांढरे यांच्या संयुक्त पथकाने दोन पंचांना सोबत घेऊन कॅनाल रोड, नगर नाका येथे छापा टाकला.
यावेळी हमेद खान नादेर खान, वय २९ वर्षे, रा. अमराई, बालेपीर नगर रोड, बीड हा सार्वजनिक ठिकाणी लोकांकडून पैसे घेऊन चिठ्ठीवर आकडे लिहून देताना आढळून आला.
त्याच्याकडून १३ हजार रुपये रोख रक्कम, एक चिटबुक, कार्बनचा तुकडा व काळ्या रंगाचा बॉलपेन, तसेच १ लाख रुपये किमतीची बर्गमन कंपनीची स्कुटी क्र. MH 23 BB 4487 आणि १० हजार रुपये किमतीचा ओपो कंपनीचा मोबाईल, असा एकूण १ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी हमेद खान नादेर खान तसेच गुंड पाटील, पूर्ण नाव माहीत नाही, रा. बीड यांच्याविरुद्ध कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
सदरची उल्लेखनीय कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. व्यंकट राम यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री. भारत पांढरे, पोलीस निरीक्षक श्री. शितलकुमार बल्लाळ तसेच पोह/१६६४ रवींद्र आघाव व पोशि/२७३ नवनाथ डाके पोशी/995 अक्षय लोंढे
चापोशी/1982 योगेश निर्धार यांच्या पथकाने अत्यंत शिताफीने व यशस्वीरीत्या पार पाडली आहे.








