कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची शिवसेना ठाकरे पक्षाची मागणी
प्रतिनिधी /संघपाल मदने
देगलूर तालुक्यातील यावर्षीचा पावसाळा संपत आला तरी अद्याप पर्यंत एकही मोठा पाऊस पडला नसल्याने खरीप हंगामातील पीक वाळून जात असल्याने शासनाने कोरडा दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना व शेतमजूरांना त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर, शिवसेनेचे मराठवाडा संपर्क प्रमुख माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांच्या आदेशानुसार संपर्क प्रमुख बबनराव थोरात, जिल्हा प्रमुख, भुजंग पाटील डक, सह संपर्क प्रमुख दयाल गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली यशिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली, दि.९ सप्टेंबर रोजी निदर्शने, घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीत नांदेड जिल्हा सह देगलूर व बिलोली तालुका वगळण्यात आले असल्याने शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजीने तहसील परीसर दणाणून गेला होता.याबाबत अधिक माहिती अशी की देगलूर तालुक्यात यंदाच्या पावसाळ्यात सुरुवातीला पेरणीयोग्य पाऊस पडला असल्याने शेतकरी बांधवांनी निसर्गाच्या भरवशावर, स्वप्न रंगवत मोठ्या आशेने कर्ज काढून, उसनवारी करीत, घरातील सोनेनाने विकुन शासनाने खतांचे , बियाणेचे दर भरमसाठ वाढलेले असतांनाही महागामोलाचे बियाणे,खते, कीडनाशके खरेदी करून सोयाबीन, कापूस,तुर, उडीद, मूग आदी खरीप हंगामातील पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात केली होती पण या हंगामात मोठा पाऊस पडला नसल्याने व मागील अनेक दिवसांपासून पिकायोग्य पाऊस पडला नसल्याने खरीप हंगामातील पिके वाळून जाऊन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी वर्गातून भविष्यात कस होईल , या चिंतेने त्यांची झोप व भुक उडाली आहे तीव्र अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यातच शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीतून नांदेड जिल्हा सहदेगलूर व बिलोली तालुका वगळण्यात आले असल्याने शेतकऱ्यांत नाराजी व संताप व्यक्त केला जात आहे , त्यामुळे दि.९ सप्टेंबर रोजी देगलूरच्या तहसील कार्यालयासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले यावेळी शासनाला निवेदन सादर करुन देगलूर व बिलोली तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी, शेतमजूरांना हाताला काम मिळावे म्हणून रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे चालू करण्यात यावे, ग्रामीण भागातील लोडशेडींग रद्द करण्यात यावी, पिकविमा मंजूर करण्यात यावे, या हंगामात घेतलेले पिक कर्ज माफ करण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन देण्यात आले यावेळी शिवसेना देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ प्रमुख पांडुरंग पाटील थडके देगावकर, शहर प्रमुख भगवान जाधव, युवा सेना तालुका प्रमुख तथा शिवसेना सोशल मीडिया नेटवर्क प्रमुख भागवत पाटील सोमुरकर, शिवसेना सेना शहर संघटक मष्णाजी पैलावार युवा सेना, उपजिल्हाप्रमुख राहुल सोनकांबळे तडखेलकर शहर प्रमुख विनोद सोनकांबळे, शिवाजी सोनकांबळे मुजळगेकर, शिवाजी चव्हाण, प्रकाश कांबळे, आदी प्रमुख पदाधिकाऱ्यासह शेकडो शेतकरी, शेतमजूर, शिवसैनिक, युवा सेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.








