सुखदेव देठे यांचे दुःखद निधन
पुणे प्रतिनिधी | एस. एन. नांदेडकर
अकोली खुर्द, ता. सोनबर्डी, जि. यवतमाळ येथील मूळ रहिवासी तथा सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेले सुखदेव देठे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ‘आम्ही भारताचे लोक – आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ’चे राज्य युवा समन्वयक प्रशांत सुखदेव देठे यांचे वडील होते. त्यांच्या निधनाने देठे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच चळवळीतील सहकाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता कात्रज स्मशानभूमी, पुणे येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ‘आम्ही भारताचे लोक – आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ’च्या वतीने दिवंगत सुखदेव देठे यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी त्यांचे पुत्र प्रशांत सुखदेव देठे, अमोल सुखदेव देठे, अजय सुखदेव देठे तसेच ‘आम्ही भारताचे लोक’ चळवळीचे प्रशांत कदम, अमोल रणपिसे, अमोल राजमाने, अँड. नितीन घोडके, विजय कांबळे यांच्यासह नातेवाईक, मित्रपरिवार व चळवळीतील सहकारी उपस्थित होते.
दिवंगत सुखदेव देठे यांच्या निधनाने देठे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. उपस्थितांनी त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण आदरांजली वाहून देठे कुटुंबीयांचे सांत्वन केले.








