आ. सुरेश धस यांच्या पाठपुराव्याने सीनेचे पाणी मेहकरीत ; शेतकऱ्यांना दिलासा
उपसरपंच पवन तरटे सह विविध गावांतील ग्रामस्थांनी मानले आभार
( दिगंबर बोडखे / प्रतिनिधी ):- आष्टी तालुक्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसमोर पाणीटंचाईचे मोठे संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत मेहेकरी धरण लाभक्षेत्रातील शेतकरी तसेच आष्टी तालुक्यातील जनतेसाठी महत्त्वाची असलेली सिना मेहेकरी जलसिंचन उपसा योजना आष्टी मतदारसंघाचे भाग्यविधाते आ.सुरेश धस यांच्या पाठपुराव्याने कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, पाण्याच्या उपलब्धतेबाबत आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.सराटे वडगावचे उपसरपंच पवन तरटे तसेच परिसरातील विविध गावांतील ग्रामस्थांनी आमदार सुरेश धस यांचे आभार मानले. विशेष म्हणजे, सिना धरण अद्याप पूर्ण क्षमतेने भरलेले नसतानाही विद्यमान आमदार सुरेश धस यांनी दुष्काळी परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत ही जलसिंचन उपसा योजना कार्यान्वित करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न झाला आहे. योजना कार्यान्वित झाल्याने मेहकरी धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतीला पाण्याची उपलब्धता होण्यास मदत होणार आहे. तसेच आष्टी तालुक्यातील विविध गावांसाठीही ही योजना महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे सिना मेहेकरी जलसिंचन उपसा योजना ही दुष्काळाच्या काळात शेतकरी व जनतेसाठी जीवनवाहिनी ठरणार, अशी भावना परिसरातील ग्रामस्थांनी व्यक्त केली. सराटे वडगावचे उपसरपंच पवन तरटे तसेच परिसरातील विविध गावांतील ग्रामस्थांनी आमदार सुरेश धस यांचे आभार मानले. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नसतानाही उपसा योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल शेतकरी वर्गाच्या वतीने आमदार धस यांचे कौतुक करण्यात आले.
“आजच्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी मोठ्या अडचणीत आहे. अशा वेळी सिना मेहकरी जलसिंचन उपसा योजना सुरू झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे. आमदार सुरेश धस यांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल सर्व लाभक्षेत्रातील शेतकरी आणि आष्टी तालुक्यातील जनतेच्या वतीने त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत,” अशी भावना पवन तरटे व परिसरातील ग्रामस्थांनी व्यक्त केली. योजना सुरू झाल्यामुळे पिकांना तसेच भविष्यातील पाणी नियोजनाला मोठी मदत होण्याची अपेक्षा असून, या निर्णयामुळे दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.








