कृषी सहाय्यकांकडून ई-पिक पाहणी पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांच्या नोंदींचे प्रलंबित Approval तात्काळ अदा करा
{अशोक ज्ञानेश्वर चौधरी माजी उपसरपंच शंकरपूर }
समीर बल्की ( चिमूर तालुका प्रतिनिधी )
चिमूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतांची ई-पिक पाहणी कृषी सहाय्यकांकडून प्रत्यक्ष पूर्ण झालेली आहे. मात्र, संबंधित तलाठी स्तरावर Approval प्रलंबित असल्याचे निदर्शनास येत आहे.
याबाबत तलाठ्यांकडे विचारणा केली असता “तलाठी संघटनेचा विरोध असल्यामुळे Approval देणे बंद आहे,” असे तोंडी सांगण्यात येत आहे.
ई-पिक पाहणीची नोंद शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असून पीक कर्ज, पीक विमा, नैसर्गिक आपत्तीतील नुकसानभरपाई तसेच विविध शासकीय कृषी योजना व अनुदानांचा लाभ घेताना त्याची आवश्यकता भासते. Approval प्रलंबित राहिल्यास शेतकऱ्यांना आर्थिक व शासकीय लाभांपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
त्यामुळे,
कृषी सहाय्यकांकडून पाहणी पूर्ण झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या ई-पिक नोंदींचे Approval तात्काळ देण्यात यावे.
Approval बंद ठेवण्याबाबत शासनाचा/सक्षम अधिकाऱ्यांचा लेखी आदेश असल्यास त्याची प्रत उपलब्ध करून द्यावी.
असा आदेश नसल्यास केवळ संघटनेच्या विरोधामुळे Approval प्रलंबित ठेवण्याबाबत चौकशी करून योग्य कार्यवाही करावी.
कोणत्याही शेतकऱ्याचा पीक कर्ज, पीक विमा, नुकसानभरपाई किंवा शासकीय योजनांचा लाभ प्रलंबित Approval मुळे अडू नये, यासाठी तातडीने आवश्यक निर्देश द्यावेत.
ही बाब सर्व शेतकऱ्यांच्या हिताची असल्याने तातडीने दखल घेऊन प्रलंबित ई-पिक पाहणीचे Approval पूर्ण करून द्यावे,








