बिलोली तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा
हेक्टरी 2 लाख रू द्या व शंभर टक्के विमा मंजुर करा
शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे मागणी
बिलोली तालुका प्रतिनिधी / गंगाधर कांबळे.
गेल्या एक महिना भरापासून पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिके पूर्णता करपु लागली आसून आता बळीराजा मोठ्या अर्थिक अडचणीत सापडला आसुन
या हवालदिल शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने बिलोली तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी २ लाख रूपये व शंभर टक्के पिक विमा मंजुर करावा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्याकडे पाठवण्यात आले.
खरीप पेरणी हंगामातील मुख्य पिक सायाबिनचा पेरा तालुक्यात सर्वाधिक आसतो.सोयाबीन बियाणे कंपन्यानी यंदा बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाहीन सोयाबीन विक्रीचा अर्थिक फटका सोसत दुबारा तिबारा पेरणी केले. पिकाचे उत्पन्न वाढीच्या अपेक्षे पोटी रासायनिक खत, किटक नाशक फवारणी,कोळपनी -खुरपनी वाढलेल्या मजुरीचा भुर्दंड सोसत पिकांचे वेळोवेळी संगोपन केले. पण ऐन फुल चट्टा बहारात आसताना गेल्या एक महीना भरापासुन वरून राजा दडी मारल्यामुळे सर्वच खरीप पिके करपु लागले आसुन शेतकऱ्यांच्या खरीप पिक उत्पन्नाच्या आशा मावळल्या आसुन आता यापुढे पडलेल्या पावसाचा तिळमाञ उपयोग नसुन या अर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाना दिलासा देण्यासाठी शासनाने बिलोली तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी २ लाख रुपये अनुदान द्यावे, शंभर टक्के पिक विमा मंजुर करावा, रब्बी हंगाम पेरणीसाठी हेक्टरी पंचविस हजार रू. द्यावे सन २०२३ते २०२५ चा थक्कीत विम्याचे वाटप करावे, बाभळी बंधारा बँक वाटर नुकसानी थकीत मावेजा वाटप करावा. आदी
मागण्यांचे निवेदन आज दि. ११ सप्टेंबर रोजी तहसिलदार बिलोली यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आले. यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस केदार पाटील साळुंके शेतकरी जनआंदोलन संघर्ष समितीचे भगवानराव मनुरकर भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे राजु पाटील शिंपाळकर,शंकरराव मावलगे, सय्यद रियाज, तानाजी पा.चिरलीकर,श्रीपत पा. साळुंके,सुर्यकांत पा. कदम, वसंत पा. बडुरकर, परबत पा. साळुंके,चक्रधर टेकाळे,शेख ईब्राहीम केसराळीकर,संभाजी साखरे, विलास पुयड,मोहन गुलाडे,शेख फेरोजपाशा, माधव साळुंके, संतोश साळुंके,विलास पुयड माधवराव जाधव, दिंगाबर दापके, माधव कबनुरे, शिवाजी साळुंके,एकनाथ हिवराळे,दत्ताहरी ईबितवार यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले.








