जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य बेमुदत अन्नत्याग आंदोलन
14 दिवस अन्न त्या करूनही सरकार गप्प का?
मारोती एडकेवार
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड : दिनांक 7 सप्टेंबर 2026 महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 5 मे 2026 रोजी च्या शासन निर्णयानुसार लघुलेखक, संवर्ग मुर्त घोषित करण्याचा निर्णय रद्द करून हा संवर्ग, पूनजीवित करावा व नियमित पदभरती सुरू करावी या प्रमुख मागणीसाठी युवा विद्यार्थी अस्युएशन महाराष्ट्र राज्याच्या, वतीने सुरू असलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलन आज चौदावा दिवशी पोहोचले आहे गेल्या,14 दिवसापासून आंदोलन करते भगवान पवार व पूजा भुरके हे अन्नत्याग करून आंदोलन स्थळी ठामपणे लढा देत आहेत सलग, तेरा दिवस अन्नत्याग केल्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक होत असून, वैद्यकीय उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येण्याची शक्यता निर्माण होत आहे. एखाद्या विद्यार्थ्याला न्याय मिळवण्यासाठी किती दिवस उपाशी राहावे, लागते सरकारच्या एका चुकीमुळे निर्णयाविरोधात आवाज उठवणाऱ्या युवकांनी आपले प्रकृती धोक्यात घालून आवाज उठवत आहेत 14 दिवस अन्नत्याग बेमुदत उपोषण सुरू असतानाही सरकार निर्णय घेत नाही याला प्रशासनाची असवेदनशीलता,म्हणायचे की विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ? ज्यांनी,अनेक वर्ष लघुलेखन टंकलेखन, व स्टेनोग्राफीचे प्रशिक्षण घेतले, लाखो रुपये खर्च केले आयुष्यातील महत्त्वाचे वर्ष या स्पर्धा परीक्षेच्या,तयारीसाठी दिली त्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो?आंदोलनाची दखल राज्यातील राजकीय नेते, मंत्री,आमदार,खासदार,अनेक पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांनी सुद्धा घेतली असून, मग इतक्या लोकप्रतिनिधी आंदोलनाची दखल घेतल्यानंतर शासन निर्णय का घेत नाही हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे? आंदोलनकर्त्याचे मागणी आहे अन्यायकारक,निर्णयाचा पूर्ण विचार करून लघुलेखक संवर्गाचे,अस्तित्व कायम ठेवण्याची मागणी केली आहे. संवर्ग संपवू नका विद्यार्थ्यांच्या रोजगाराची संधी वाचवा,लघुलेखक संवर्ग पुनर्जीवित करा,आणि नियमित भरती सुरू करा अशी, मागणी युवा विद्यार्थी असोएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तुषार देशमुख, व सर्व आंदोलन करते विद्यार्थी गोविंद पाटील,भगवान पवार, ग सू पडोळे,विष्णू कदम, संकेत माडजे,ज्ञानेश्वर मोरे, प्रभू सावते,हनुमान माहोरे, अंतेश्वर कानगुलवार, संतोष यांनावार,विकी गज्जेवार, अनिल ढेंबरे,शिवानंद कदम, मुजाजी खराने,पूजा भुरके, सोनी राठोड, प्रणिता ढगे, संगीता हिंगमिरे,कोमल केंद्रे, पूजा वने, जना पावडे, विद्या भोसले, श्वेता हिंगमिरे, व युवा विद्यार्थी आशोसिएशन महाराष्ट्र राज्याने केली आहे, या आंदोलनाकडे सरकार कोणत्या भूमिकेने पाहत आहे हा या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.








