टाकळीभान ग्रामपंचायत वरती प्रशासक म्हणून पंचायत समिती श्रीरामपूरचे कनिष्ठ अभियंता श्री.गणेश व्हि. खेडकर यांची नियुक्ती
टाकळीभान प्रतिनिधी – संदीप जाधव
दिनांक ११ सप्टेंबर २०२६ : श्रीरामपूर तालुक्यातील सर्वात मोठी व राजकीयदृष्ट्या महत्वाची असलेल्या टाकळीभान ग्रामपंचायत वर शासन निर्णय महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार-ब, असाधारण क्रमांक ५१३, ग्रामविकास विभाग, अधिसूचना, दि. ०८/०९/२०२६.अन्वये प्रशासक म्हणून पंचायत समिती श्रीरामपूरचे कनिष्ठ अभियंता श्री.गणेश व्हि. खेडकर यांची नियुक्ती झाली आहे.
तसेच उपरोक्त संदर्भ शासन निर्णयाअन्वये अहिल्यानगर जिल्ह्यातील जानेवारी २०२६ व फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मुदत संपलेल्या ७५३ ग्रामपंचायतीवर विद्यमान सरपंचाची, सहा महिन्यांच्या कालवधीसाठी किंवा ग्रामपंचायत स्थापनेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत, यापैकी जे आधी असेल त्या कालावधीसाठी प्रशासक म्हणून आदेश देण्यात आलेला होता. सदर आदेशाने नेमणूक केलेल्या प्रशासक व प्रशासकीय समिती यांचा सहा महिन्यांचा कालावधी संपल्यामुळे शासन निर्णया अनुसार एकूण 754 ग्रामपंचायतीवर शासकीय अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती जिल्हा परिषद अहिल्यानगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.आनंद भंडारी यांचे आदेशानुसार झाली आहे








