सर्व सांस्कृतिक सनामधील वैज्ञानिक दृष्टीकोन विद्यार्थ्यांनी आत्मसात करावा.सोंडारे
————————————
गंगाधर कांबळे प्रतिनिधी
महाराष्ट्र साजरे होणारे प्रत्येक सन आणि त्या बदल असलेला वैज्ञानिक दृष्टीकोन विद्यार्थ्यांनी आत्मसात करण्याची गरज आहे असे प्रतिपादन समतादुत दिलीप सोंडारे यांनी व्यक्त केले.
दिनांक.10 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव येथे पोळा सणाच्या निमित्ताने वॄक्षारोपन करुन विद्यार्थी यांना संस्कृती संवर्धन यावर प्रबोधन करण्यात आले.प्रत्येक सन आणि बनवणारे खाद्य पदार्थ यांचा निसर्गाशी कसा वैज्ञानिक संबंध आहे यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.सदर कार्यक्रम बार्टीच्या महासंचालीका, निबंधक, विभाग प्रमुख, तसेच नांदेड जिल्हा सहाय्यक समाज कल्याण आयुक्त श्री शिवानंद मिनगीरे समाज कल्याण अधिकारी श्री गजानन नरवाडे, जिल्हा प्रकल्प अधिकारी श्री मुंजाजी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वॄक्षारोपन पंधरवड्यात समतादुतांनी सदर कार्यक्रम आयोजित केला होता.
शाळेतील मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.








