मावशी, साप आला !’ म्हणत वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावले, यवत पोलिसांनी सराईत आरोपीस जेरबंद करुन ६ ग्रॅम सोने केले परत “
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे दापोडी ता दौंड जिल्हा पुणे गावच्या हद्दीतील जमीन गट नं.५९ मधील शेतजमिनीत. फिर्यादी सौ.सुनंदा बापू रूपनवर,वय ६५ वर्षे या ऊस पिकाची लागवड करून शेतातील झाडाच्या सावलीला बसलेल्या असताना आरोपी सुमित उर्फ घा-या साळुंखे व त्याचे दोन अनोळखी साथीदार मोटार सायकल वरून तेथे आले. त्यापैकी दोघे फिर्यादी यांच्या जवळ आले व मावशी, साप आला !’ असे मोठ मोठ्याने सांगुन फिर्यादी यांना घाबरवुन पळण्यास भाग पाडले. फिर्यादी घाबरून पळत असताना आरोपींनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने (आक्कासाहेब डोरले) व काळे मण्यांची पोत जबरदस्तीने हिसकावुन घेतली व तिघेही मोटारसायक लवर स्वार होवुन घटनास्थळा वरून फरार झाले. हि घटना दिनांक ०९/०८/२०२६ रोजी दुपारी २:३० वाजे सुमारास घडली होती. सदर घटने बाबत फिर्यादी सौ.सुनंदा बापू रूपनवर,वय ६५ वर्षे यांच्या फिर्यादीवरून यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.८९८/२०२६, भा.न्या.सं.कलम ३०९ (४) अन्वये दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे तपासात असलेल्या यवत पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण व कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे अल्पावधीत छडा लावुन गुन्हा उघडकीस आणला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी सुमित उर्फ घा-या ईश्वर साळुंखे, वय १९ वर्षे, रा. बोरीपार्धी, ता. दौंड, जि. पुणे यास पोलिसांनी ताब्यात घेतले असुन, त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेला अंदाजे ६ ग्रॅम वजनाचा सोन्याचे आक्कासाहेब डोरले व काळे मण्यांची पोत किंमत अंदाजे ६५ हजार रुपये किंमतीचे तसेच गुन्ह्यात वापरलेली होंडा शाईन मोटारसायकल, अंदाजे किंमत ३० हजार रुपये असा एकुण ९५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून जप्त करण्यात आला आहे. उर्वरित दोन अनोळखी आरोपींचा शोध सुरू असुन त्याबाबत पुढील तपास सुरू आहे. सदर मुद्देमाल परत मिळाल्याने वृध्द महिलेने यवत पोलीसांचे आभार मानले आहेत.
सदरची कारवाई संदिप सिंह गिल्ल (पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण), गणेश बिरादार ( अपर पोलीस अधिक्षक, बारामती विभाग), बापुराव दडस (उपविभागीय पोलीस अधिकारी, दौंड उप विभाग) यांचे मार्गदर्शनाखाली यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, सहा पोलीस निरिक्षक आबा गाढवे, पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण गाडेकर, पोलीस हवालदार रॉकी देवकाते, पोलीस हवालदार संदिप देवकर, पोलीस हवालदार अमोल काळे, पोलीस कॉ धिरज जाधव, पोलीस कों/अमोल भुजबळ, पोलीस कॉ सचिन गुंड, पोलीस कॉ प्रतिक धिवार, पोलीस कॉ प्रतिक जगताप, पोलीस कॉ विकास मोरे, पोलीस कॉ दिनेश लोणकर, पोलीस कॉ विनित कु-हाडे यांचे पथकाने केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण गाडेकर हे करीत आहेत.








