पुयारदंड येथे बैलपोळ्याचा जल्लोष ! सर्जा-राजाचा थाटात सन्मान
समीर बल्की तालुका प्रतिनिधी
शेतकरी आणि बैलांच्या अतूट नात्याचे प्रतीक असलेला पारंपरिक बैलपोळा सण छत्रपती शिवाजी महाराज मंडळ पुयारदंड येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांनी आपल्या सर्जा-राजाला आकर्षक पद्धतीने सजवून त्यांची विधिवत पूजा केली. बैलांच्या सन्मानाने गावातील वातावरण भक्तिमय व उत्साहपूर्ण झाले होते. पोळ्यानिमित्त शेतकऱ्यांनी बैलांना सजवून त्यांची पूजा-अर्चा केली. वर्षभर शेतीच्या कामात
शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून मेहनत करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही परंपरा येथे मोठ्या दिमाखात जपण्यात आली. या सोहळ्यास गावातील प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, युवक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सजवलेल्या बैलांमुळे गावातील वातावरणाला
विशेष रंगत आली होती. पारंपरिक पद्धतीने पोळा साजरा करत ग्रामस्थांनी या उत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृती आणि शेतकरी बैलांचे नाते जपले. बळीराजाच्या कष्टाला आणि सर्जा-राजाच्या योगदानाला सलाम करणारा हा पोळा सोहळा छत्रपती शिवाजी मंडळ पुयारदंड 45 शेतकरी मालकाला टॉवेल भेट देण्यात आले विशेष उत्साहाचा ठरला.








