नगरसुल येथे मक्याच्या शेतात अचानक भगदाड पडल्याने भीतीचे वातावरण
लक्ष्मण घुगे राजापूर प्रतिनिधी
: येवला तालुक्यातील नगरसुल येथील लहीत रोड कुडके याच्या मळ्यात चिंचेच्या झाडापाशी शेतकरी पतंग भागवत कुडके गट नंबर १७२० मध्ये सकाळच्या सुमारास मक्याच्या शेताला पाणी देण्यासाठी गेले असता अचानक मोठा आवाज झाला आवाजामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. आजूबाजूला पाहिले असता मकाच्या शेतात भगदाड पडल्याचे पाहिले जमिनीला वर तीन फुटाचे असून आत राजनासारखे गोलाकार व रुंद असून खोली सुमारे वीस ते पंचवीस फूट खोल असून या भगदाड बाबत पतंग कुडके , व उत्तम कुडके यांनी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार भाऊलाल कुडके यांना याबाबत माहिती दिली त्यावर माहिती मिळताच कुडके यांनी शासनाला याबाबत माहिती व म्हणून नगरसुल कामगार तलाठी कार्यालयाशी संपर्क करून कोतवाल गाडेकर यांना याबाबत कल्पना दिली. या भगदाडा बाबत भीतीचे भीतीचे वातावर वातावरण निर्माण झाले असून या बाबर तर्कवितर्क काढीत चर्चा लोक चर्चा करीत आहे .
//सकाळच्या सुमारास शेतात पाणी भरायला गेलो असता अचानक जोराचा आवाज होऊन शेतात मोठे भगदाड पडल्याने मी घाबरलो जरा वेळ काहीच सुचेना सुदैवाने या ठिकाणा पासून बरेच अंतरावर असल्याने काही अनुचित प्रकार घडला नाही. शासनाने याची दखल घेऊन चौकशी करावी आमच्या मनातील भीती दूर करावी
पतींग भागवत कुडके शेतकरी नगरसुल//
नगरसुल,: लहित रोड कुडके याच्या मळ्यात मक्याच्या शेतात पडलेले मोठे भगदाड
छाया -भाऊलाल कुडके








