रायपूर येथे बैलपोळा उत्साहात; शेतकऱ्यांची मोठी गर्दी
रायपूर प्रतिनिधी – सागर इंगळे :
रायपूर येथे शेतकऱ्यांचा पारंपरिक बैलपोळा सण मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. बैलांना आकर्षक रंगरंगोटी करून, विविध प्रकारच्या फुलांच्या माळा, सजावटीचे साहित्य व रंगीबेरंगी शिंगांनी सजवून पोळा सणासाठी आणण्यात आले होते.
यावेळी सजवलेल्या बैलांची मिरवणूक पाहण्यासाठी तसेच बैलपोळ्याचा आनंद घेण्यासाठी शेतकरी व नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. परिसरात पारंपरिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनाप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करत बैलांची पूजा केली.
बैलपोळ्याच्या निमित्ताने रायपूर परिसरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून, पारंपरिक संस्कृती आणि ग्रामीण जीवनाचे दर्शन घडले.








