*वाद्यनिर्मितीतील प्रदीर्घ योगदानाची दखल; भालेराव दळाजे यांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार*
किनवट प्रतिनिधी – मार्कंडेय सिरामवार
किनवट : -वाद्यनिर्मिती या कलाक्षेत्रात एकनिष्ठतेने प्रदीर्घ काळ विशेष कार्य करून लोककला आणि सांस्कृतिक परंपरेच्या जतन-संवर्धनासाठी उल्लेखनीय योगदान देणारे भालेराव नागोराव दळाजे यांना महाराष्ट्र शासनाचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार २०२५ प्रदान करून गौरविण्यात आले.
वाद्यनिर्मितीच्या माध्यमातून पारंपरिक लोककलेला जिवंत ठेवत सांस्कृतिक वारसा समृद्ध करण्यासाठी दळाजे यांनी केलेल्या कार्याची शासनाने घेतलेली दखल हा किनवटच्या कला क्षेत्रासाठी अभिमानाचा क्षण ठरला.
लोकप्रिय आमदार भीमरावजी केराम यांच्या शुभहस्ते दळाजे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या दीर्घकालीन कलासेवेची शासनस्तरावर दखल घेतल्याने किनवट परिसरातील कला क्षेत्रातून समाधान व्यक्त होत आहे.
पुरस्कार प्रदान सोहळ्यास सहाय्यक जिल्हाधिकारी बी. सरवनन, तहसीलदार शारदा चौडेकर, अभिजित जगताप, गटविकास अधिकारी डी. टाकरस, बाबुराव केंद्रे, सुनील व्यावहारे, वसंतराव कुदमते, आनंद मच्छेवार, बालाजी बामणे, आमदारांचे जनसंपर्क अधिकारी संतोष मरस्कोल्हे, संतोष अडकिने, श्री. अक्रम भाई, दीपक कुदमते, मोहन दळाजे, जंगू मडावी यांच्यासह आदी मान्यवर, ग्रामस्थ व नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले. वाद्यनिर्मितीच्या माध्यमातून लोककला आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा जिवंत ठेवणाऱ्या भालेराव नागोराव दळाजे यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.








