श्रावण मासात आरोग्यसेवेचा जागर; होट्टल चालूक्य नगरीत भव्य आरोग्य शिबिर संपन्न.
देगलूर प्रतिनिधी मनोज बिरादार
देगलूर (होट्टल) -दिनांक 7 सप्टेंबर 2026 रोजी अखिल भारतीय बहुजन ओबीसी अल्पसंख्यांक भ्रष्टाचार निर्मूलन असोसिएशन देगलूर आणि निर्मल न्युरोकेअर अँड सुपर स्पेशलिटी सेंटर, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने सिद्धेश्वर मंदिर, होट्टल येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रीय उपाध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष *मा. श्री. बाळासाहेब उर्फ राजू पाटील सुरनर* यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*विशेष:* या शिबिराला देगलूर तालुक्यातीलच नव्हे तर तेलंगणा, महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातून सिद्धेश्वर दर्शनासाठी आलेल्या भाविकांनीही मोठ्या संख्येने लाभ घेतला. होट्टल गावातील ग्रामस्थांसह *७०० हून अधिक भाविकांनी* आरोग्य तपासणी करून घेतली.
या शिबिरात रक्तदाब, मधुमेह, न्युरो तपासणी, ईसीजी, मोफत औषध वाटप व आरोग्य सल्ला देण्यात आला.
*सहभागी मान्यवर डॉक्टर:*
डॉ. स्वप्नील आढाव पाटील (न्युरोसर्जरी), डॉ. संकेत आढाव पाटील, डॉ. किरण जंगमवार, डॉ. प्रतिक कांगणे, डॉ. नेहा शिकरे, डॉ. ॲस्मीन शेख, डॉ. ओमकार देवसरकर आदी. तसेच मजीत सर, नागेश्वर मॅचेवार, सचिन शिवरे, समीक्षा इंगळे, पिंकी मॅडम, मधुकर (मॅनेजमेंट), किशन जंगमवार यांनी परिश्रम घेतले.
शिबिर यशस्वी केल्याबद्दल आयोजकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.








