*शेतकरी विरोधी नीति निषेधार्थ मूर्तिजापूरत काळा पोळा*.
————————————
मिलिंद इंगळे प्रतिनिधी: सरकारच्या मोठ मोठ्या घोषणा,केवळ पोकळ आश्वासन देऊन शेतकऱ्यांच्या पदरात आजपर्यंत काहीच आर्थिक लाभ न टाकल्या मुळे मूर्तिजापूर तहसील परिसरात तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकवटून काळा पोळा साजरा केला.
नगरपालिका कार्यालयापासून सजवलेल्या बैल जोड्या, वाजत गाजत एस.डी.ओ. कार्यालयासमोरील प्रांगणात पोहचून, उपस्थित शेतकऱ्यांनी विविध मागन्याच्या घोषणा देत सरकारचा निषेध केला.
मुख्यमंत्र्यांनी सरसकट कर्जमाफीचे आश्वासन निवडणुकीपूर्वी मुर्तीजापुरातल्या प्रचार सभेत दिले होते. सरसकट कर्जमाफीचे आश्वासन मात्र त्यांनी पाळले नाही.कर्ज माफीतून २०१९ पूर्वीचे थकबाकीदार तसेच पुनर्गठित शेतकऱ्यांना कर्जमाफीतून अनेक अटी ,शर्ती ,नियम लावून वगळण्यात आले.
२०२५ वर्षा करिता हे. १७५००रू.पिक विमा, विमा काढलेल्या व विमा न काढलेल्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी घोषित केला होता परंतु आजपर्यंत एकही रुपया शेतकऱ्यांना देण्यात आलेला नाही.
सदोष सोयाबीन बियाण्यामुळे अनेक शेतकऱ्यांची. फसवणूक झाली शेती नापेर राहिली परंतु नुकसान भरपाईपोटी सरकारने स्वतः किंवा बियाणे कंपन्यांकडून कोणतीही आर्थिक मदत अजून पर्यंत जाहीर केली नसल्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे.
या सर्व शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारपर्यंत
पोहचवण्यासाठी जनमंच, स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रगती शेतकरी मंडळ व विविध संघटना मार्फत १५ मे रोजी ४६ डिग्री तापमानात मोठा ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. प्रशासनाने फक्त आश्वासने दिली. कृती केली नाही.
या दिलेल्या आश्वासनाच्या आठवणीसाठी पुन्हा २२ जून रोजी ४५ डिग्री तापमाना एस.डी.ओ.ऑफिस समोर उघड्यावर, भरउन्हात फरशीवर बसून प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू भाऊ वानखडे यांनी आमरण उपोषण आरंभिले. दोन दिवसानंतर याची दखल आमदार,पालकमंत्री यांनी घेऊन मुंबई येथे कृषी मंत्री यांच्या दालनामध्ये बैठक घेतली . भरपूर आश्वासने दिल्या गेलीत पण आज पर्यंत शेतकऱ्यांच्या पदरात एकही रुपया पिक विमा, सदोष सोयाबीन बियाणे नुकसान भरपाईचा सरकारने दिलेला नाही. अजून पर्यंत दुष्काळ घोषित केलेला नसून दुष्काळाचे हे. तेरा हजार पाचशे रुपये व पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर निधी दसऱ्यापूर्वी मिळावेत, चालू वर्षाचा २५% अग्रीम पिक विमा दिवाळीपूर्वी द्यावा अशा मागण्यांचे फलक उपस्थित त्यांच्या हातात होते.
पाऊस नाही, विहिरींना पाणी नाही, उन्हाचा चटका वाढला त्यामुळे सोयाबीन पीक करपले असून शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. प्रपंच कसा चालवणार मुलांचे शिक्षण, आरोग्य व पिक कर्जाचा भरणा कसा करणार, शासनाचे शेतकऱ्यांकडे मुळीच लक्ष नाही यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष खदखदत आहे.
परंतु या परिस्थितीकडे सरकारचे लक्ष वेधावे, आर्थिक मदतीचा ओघ वाढावा, याकरताच या आंदोलनाचे आयोजन केल्या गेले. तालुक्यातील ४५ गावातमध्ये जाऊन राजूभाऊ वानखडे यांनी शेतकऱ्यांची संवाद साधला, जनजागृती केली , तरुण शेतकऱ्यांना आवाहन केले. त्यामुळेच पोळ्याच्या दिवशी सुद्धा या आंदोलनात प्रत्येक गावातील शेतकरी सामील झाला.
या पूर्वीचा कटू अनुभवावरून सरकारच्या या शेतकरी विरोधी नीतीचा काळा पोळा ,काळे वस्त्र परिधान करून, हातात काळे झेंडे घेऊन सरकारच्या धोरणांचा निषेध करून साजरा केला.
सरकारने अजूनही जर लक्ष दिले नाही, आर्थिक मदत दिली नाही तर आम्ही आमच्या लेकरा बाळासह येथे पुन्हा येऊन आमरण उपोषण करू अशी घोषणा प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजूभाऊ वानखडे यांनी आपल्या जाहीर भाषणातून केली.
तहसीलदार शिल्पाताई बोबडे यांनी कार्यालय बाहेर येऊन काळापोळा आंदोलकांना आपल्या मागण्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले.
यावेळी जनमंच नागपूर चे प्रा. सुधाकर गौरखेडे, स्वाभिमानीचे अध्यक्ष कैलास साबळे, डॉ. संजय उमाळे, प्रमोद राजंदेकर, शरद सरोदे, सुभाष मोरे, बाळासाहेब खांडेकर, अभी पोळकट, योगेश सोळंके, मुन्ना नाईक नवरे, नंदकिशोर बबानीया, मनोहर ताकतोडे, प्रफुल्ल मालधुरे, प्रवीण ढगे, स्वप्निल जामनिक, गोपाल तायडे, अरुण बोंडे व तालुक्यातील प्रत्येक गावातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
Related Posts
Add A Comment








