वंचित बहुजन आघाडी व वंचित एकलव्य आघाडी पक्षाच्या वतीने राहुरी नगरपरिषदेवर मोर्चा .
प्रतिनिधी | दिनेश गायकवाड |
दिनांक ९ सप्टेंबर २६ : रोजी वंचित बहुजन आघाडी वंचित एकलव्य आगडी पक्षाच्यावतीने राहुरी नगर परिषदेवर आदिवासी दलित वंचित बेघर समाजाच्या व घरकुल व जागा मिळण्याबाबत राहुरी नगर परिषदेवर बिराड मोर्चाचं आंदोलन पार पडले या मोर्चाच्या नेतृत्व स्थानी वंचित बहुजन महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष अनिता ताई जगधने व वंचित एकलव्य आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष ज्योतीताई गायकवाड व वंचित बहुजन आघाडीच्या माजी नगरसेविका आशाताई माळी व परेशान महिला कार्यकर्त्या वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे प्रवक्ते व एकलव्य आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अनिलराव जाधव व आवर्जून या मोर्चाला पाठबळ देण्यासाठी जामखेडचे नगरसेवक वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रवक्ते अरुण आबा जाधव व उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष देवळाली नगरपालिकेचे नगरसेवक संतोष भाऊ चोळके व जिल्ह्याचे सचिव बाबासाहेब भगवान साठे व जिल्हा संघटक अमजद भाई पठाण एकलव्य आघाडीचे डॉक्टर नारायण माळी सिताराम माळी बुवासाहेब माळी व वंचित बहुजन आघाडीचे पिंटू नाना साळवे व राहुरी तालुका प्रमुख बाळासाहेब जाधव वय आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता आवर्जून उपस्थित असणारी सफाई कर्मचारी संघटनेचे व भीम आर्मी या सामाजिक संघटनेचे जिल्हाप्रमुख तानसेन भाई दिवाल व आदिवासी संघर्ष सेनेचे तालुकाप्रमुख नवनाथ गायकवाड व कविताताई पवार व सर्व आदिवासी दलित समाजातील महिला व कार्यकर्ते या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते व मोर्चाचं मार्गदर्शन करतानी वंचित चे जिल्हा सचिव बाबासाहेब भगवान साठे राहुरी नगर परिषदेचे सिओ पाटील मॅडम व नगराध्यक्ष मोरे सर व सर्व नगरपालिकेचे अधिकारी यांना जाब विचारताना व 1972 ला राहुरी नगरपालिकेची स्थापना झाली त्याकाळी प्रथम नगराध्यक्ष कैलासवासी लाला शेठ बिहानी उर्फ शेडजी हे राहुरी नगरपरिषदेचे प्रथम नगराध्यक्ष झाले व राहुरी शहरांमध्ये शहराचे परिवर्तन कशा पद्धतीने करायचे ते त्यांच्या कामातून नागरिकांना अनुभवास मिळाले व 1972 मध्ये नगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर जो आदिवासी समाज राहुरी मध्ये वास्तव्यात होता त्या समाजाचा विचार करून त्यांचा निवाऱ्याचा विचार करून कैलासवासी लालाशेत बियाणींनी पहिली घरकुल योजना आदिवासी समाजाकरता व त्यांच्या राहण्याची हक्काचे घर देण्याचे काम या प्रथम नगराध्यक्षांनी केले व आज देखील नगर मनमाड लागत हवे बाजूला आजही एकलव्य वसाहत अस्तित्वात आहे परंतु त्यानंतर सत्ता परिवर्तन होऊन गेली 53 54 वर्षे उलटली ज्या ज्या लोकांनी ्या ज्या पुढार्यांनी या नगरपालिकेवर आपल्या घराणेशायचं राजकारण केलं त्या एकाही पुढाऱ्यांनी एकाही नगराध्यक्षांनी पुन्हा आदिवासी समाजासाठी राहुरी नगर परिषदेचे हद्दीमध्ये एकही आदिवासीला पुन्हा घरकुल बांधून दिले नाही म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून उपेक्षित वंचित समाजाला मग ते कुठलाही समाजाचा असो कुठल्याही जाती धर्माचा असो अशा समाजाला अशा वंचित घटकाला जो घरापासून वंचित आहे त्याला राहण्यासाठी कुणी नाही ज्याला स्वतःची जागा नाही अशा सर्व घटकांसाठी नगरपालिकेने सामुदायिक घरकुल योजना राबवून त्यांना स्वतःचे घर घरकुल व घरे बांधून द्यावेत व ते घर त्यांचे नावे असावीत याकरता वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या मोर्चाचे आंदोलनाचे अशाच निवेदन लेखी स्वरूपात राहुरी नगर परिषदेला देण्यात आली व नगरपालिकेने देखील याची दखल घेऊन लवकरात लवकर पूर्ण नगरपालिके हद्दीतील जे परिवार स्वतःच्या जागे पासून घरकुल पासून वंचित आहे अशा सर्वांचा सर्वे करण्याचा वंचित बहुजन आघाडीच्या निवेदनाला लेखी स्वरूपात मान्य केली व येत्या काळात लवकरात लवकर समस्त वंचित व उपेक्षित समाजाची राहण्याची व घरकुलाची व पालिकेतल्या सर्व सुख सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची सी ओ पाटील मॅडम व नगराध्यक्ष मोरे सर यांनी गवाई दिली यानंतर येत आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आली व सर्वांचे आभार वंचित बहुजन आघाडीचे महिला अध्यक्ष आणि त्या ताई जगधने ज्योतीताई गायकवाड आशाताई माळी या सर्व महिला मंडळींनी मांडले जय भीम जय संविधान जय एकलव्य जय अण्णाभाऊ साठे








