ठाणे-मुंबई येथे उद्योग मेळावा उत्साहात संपन्न
रोहन सोनाळे | पिंपरी चिंचवड |
उद्योजकता, आयात-निर्यात व व्यवसायवृद्धीबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन; युवक-युवतींसह उद्योगकांचा उत्स्फूर्त सहभाग
ठाणे : ठाणे-मुंबई येथे आयोजित उद्योग मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विविध क्षेत्रातील उद्योजक, आयात-निर्यात व्यवसायाशी संबंधित प्रतिनिधी तसेच उद्योग क्षेत्रात पदार्पण करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींनी या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
कार्यक्रमाचे उद्घाटन रत्नदीप कांबळे (BEACI) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शक म्हणून शैलेश पाल, सूक्ष्म व लघु उद्योग मंत्रालय, भारत सरकार यांचे महेश्वरी सर, तसेच कार्यक्रमाचे प्रमुख संजय गेडाम यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाला संजय कांबळे, सुनील वायपंजे, राधेश्याम खिल्लारे, स्वयं बनसोडे, दीपा पवार (युके), सुरेश पाटील (कॅनडा), भगीरथ कदम, पौर्णिमा कदम (सम्राट मसाले), प्रा. युवराज भास्कर टिकटे (युवा वादळ उद्योग समूह) आणि अजिंक्य अंतळे (युवा वादळ ठाणे-कल्याण विभाग) यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मेळाव्यात उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक नियोजन, व्यवसायवृद्धी उपस्थित मान्यवरांनी प्रतिपादन केले.








