शिंदवणे या ठिकाणी नृत्यांगणा गौतमी पाटील च्या कार्यक्रमाला विरोध. उरुळी कांचन पोलीस ठाण्यात प्रा.सदाशिव कांबळे यांचे निवेदन.
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दि. १२ सप्टेंबर २०२६ : शिंदवणे या ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित नृत्यांगणा गौतमी पाटील हिचे कार्यक्रमाला परवानगी नाकारणे बाबत शिंदवणे येथील नागरिक तथा संघ नायक न्यूजचे संपादक प्रा.सदाशिव रमेश कांबळे यांनी बुधवार,दि.०९ सप्टेंबर, २०२६ रोजी उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांस निवेदन देण्यात आले आहे. या वेळी शिंदवणे येथील नागरिक सोमनाथ खेडेकर, शंकर जराड यावेळी उपस्थित होते. प्रा.सदाशिव कांबळे यांनी दिलेल्या तक्रारी निवेदन अर्जात म्हटले आहे की दि.१४ सप्टेंबर ते पुढील १० दिवसाचे कालावधीमध्ये शिंदवणे ग्रामपंचायत गावठाणातील मैदानात शिव छत्रपती तरुण मंडळाच्या वतीने नृत्यांगणा गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
शिंदवणे गावच्या भूमीला छत्रपती शिवाजी महाराज ते फुले शाहू डाॅ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांचा वारसा आहे. तसेच संत यादव बाबा यांचे पदस्पर्शाने पावन झालेली पवित्र शिंदवणे नगरी आहे. हवेली तालुक्यातील निसर्गरम्य सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि आध्यात्मिक वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार करणारे आदर्श गाव म्हणून सुपरिचित असून पंचक्रोशीत ओळख आहे. सार्वजनिक गणेश उत्सवाच्या निमित्ताने नृत्यांगणा गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे माझी भावना दुखावलेली आहे. मला मानसिक त्रास झालेला आहे. धार्मिक पावित्र्याचा मुद्दा पुढे करुन, शिंदवणे गावातील युवा वर्ग आणि नागरिकांचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवून, विकृती जोपासली जात आहे.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गौतमी पाटीलचे कार्यक्रम समाजहित लक्षात घेता पोलीस प्रशासनाला रद्द करावे लागलेले आहेत.
गौतमी पाटीलचे कार्यक्रमात डीजे,आक्षेपार्ह तसेच अश्लील नृत्याचा प्रकार घडत असतो. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी गोंधळ निर्माण झालेली अनेक उदाहरणे महाराष्ट्रात घडलेली पाहिली आहेत. अश्लिल व विकृत नृत्यांच्या कार्यक्रमामुळे महिला, वृद्ध व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. धार्मिक उत्सवाला गालबोट लागून गावाची प्रतिमा डागळते. डागळण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे शिंदवणे गावठाण येथील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गौतमी पाटीलचे कार्यक्रमास प्रतिबंध घालणे गरजेचे आहे. अर्धनग्न अवस्थेमध्ये अंगविक्षेप परीधान करुन युवा तरुणांचा समतोल बिघडवणारी व सामाजिक स्वास्थ्य व आरोग्य बिघडत असलेल्या कृतीला गावातील जागृत नागरिक म्हणून माझा विरोध आहे.
पुणे शहरात काही दिवसांपूर्वी नृत्यांगणा राधा पाटील हिचेवर नृत्य करताना अश्लिल हावभाव केल्याचे प्रकरणावरुन राधा पाटील व आयोजकांवर बिबेवाडी पोलीसांनी गुन्हे दाखल केले आहेत. उरुळी कांचन पोलीस प्रशासन अधिकारी साहेबांनी सदर तक्रार अर्जाची गांभीर्याने दक्षता घेऊन आपले स्तरावर उचित ती प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली असून तक्रारी अर्जाची दखल घेऊन शिंदवणे गावाला सामाजिक न्याय देऊन सहकार्य होईल हीच अपेक्षा व्यक्त करतो असे निवेदनात सदाशिव कांबळे यांनी म्हटले आहे.








