भुसावळ तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा
प्रतिनिधी | नीलेश सोनवणे |
गेल्या एक महिन्यापासून पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम हातचा गेल्याने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे शासनाने भुसावळ तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयाची सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी भुसावळ तालुक्यात शेतकरी संघटनेने केली आहे यंदा खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम हाताचा गेला आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे कापूस मका सोयाबीन,उडीद, मुग, बागायती पिके करपून गेली आहे पावसाने सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांची परीक्षा घेतली आहे वेळेवर आणि समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे खरीप हंगामाची पिके धोक्यात आली आहे अनेक भागात पिकांना पाण्याची गरज असताना आभाळाकडे डोळे लावून बसण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे तसेच विहिरी व जलसाठ्यांची पातळी खालावली आहे. त्यामुळे आगामी रब्बी हंगामाची चिंता सुद्धा शेतकऱ्यांना लागली आहे








