सन्मान बळीराजाचा , उंद्री पट्टी देगलूर तालुका मुखेड येथे BSS 360 (टरबूज) वाणाचे पिक प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न.
विशेष प्रतिनिधी | मनोज बिरादार | मुखेड तालुक्यातील उंद्री पट्टी देगलूर येथे पार्वती माता रस्त्यावरील शिवकुमार गंगाधर पाटील सूर्यवंशी व उमाकांत गंगाधर पाटील सूर्यवंशी यांच्या शेतात **कलश सीड्स प्रा. लि.**च्या वतीने BSS 360 (टरबूज) वाणाचे पिक प्रात्यक्षिक पाहणी आणि ‘सन्मान बळीराजाचा’ कार्यक्रम शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाला उंद्रीसह परिसरातील विविध गावांतील जवळपास शंभर शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांना BSS 360 (टरबूज) वाणाची प्रत्यक्ष शेतात पाहणी करून त्याच्या वैशिष्ट्यांची माहिती देण्यात आली.
BSS 360 (टरबूज) वाणाचा कालावधी सुमारे ६० दिवसांचा असून एकरी २५ ते ३० टन उत्पादन क्षमता असल्याचे कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितले. या वाणाच्या फळांचे वजन साधारण २ ते ८ किलोपर्यंत असून फळाचा आतील रंग लाल आणि गोडवा चांगला असल्याने बाजारपेठेत मागणी असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे या वाणाची लागवड तिन्ही ऋतूंमध्ये करता येते, तसेच रोगराईचे प्रमाण तुलनेने कमी असल्याचा दावा करण्यात आला.
शेतकरी उमाकांत पाटील सूर्यवंशी यांनी दीड एकर क्षेत्रात BSS 360 (टरबूज) वाणाची लागवड केली असून या क्षेत्रातून जवळपास ३५ टन उत्पादन अपेक्षित आहे.
लागवडीसाठी सुमारे सव्वा लाख रुपये खर्च आल्याचे त्यांनी सांगितले. मागील सहा वर्षांपासून ते टरबूज पिकाची लागवड करीत असून यंदाच्या वाणाचा अनुभव चांगला असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी BSS कलश सीड्सचे जिल्हा प्रतिनिधी माधव काळे यांनी शेतकऱ्यांना कलश कॅंडी कलिंगड वाणाबाबत मार्गदर्शन केले. सुरुवातीला या पिकाची वाढ कमी दिसत असली तरी पुढील वाढ चांगली होते. बेडची रुंदी साडेपाच ते सहा फूट ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला. तसेच नायट्रोजन बेसचा अतिरिक्त वापर टाळण्याचे आवाहन केले.
कमी मेहनत, चांगले उत्पादन आणि कमी रोगराई, या दृष्टीने कलश कॅंडी कलिंगड वाण शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते, असे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष पिकाची पाहणी करून कंपनीच्या प्रतिनिधींकडून लागवड व व्यवस्थापनाबाबत माहिती घेतली.








