बुलढाणा -शहरात गणेशोत्सवाचा उत्साह ; गणेशमूर्ती खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी लगबग ..
उज्वल जैस्वाल | जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा |
बुलढाणाः गणेशोत्सवाच्या पावन पर्वाला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने बुलढाणा शहरात भक्तीचा आणि उत्साहाचा उत्साह संचारला आहे. गणरायाच्या आगमनाची ओढ लागल्याने शहरातील बाजारपेठांमध्ये गणेशमूर्ती खरेदीसाठी मोठी लगबग सुरू झाली असून, सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
शहरातील विविध गणेश मूर्तीच्या दुकानांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. यंदा नागरिकांच्या आवडीनुसार विविध रूपांतील, आकर्षक आकारांतील आणि मनमोहक रंगसंगतीतील गणेशमूर्तीचे प्रदर्शन उभारण्यात आले आहे. पारंपरिक दगडी आणि मातीच्या मूर्तीपासून ते आधुनिक आणि कलात्मक गणेशमूर्तीपर्यंत सर्व प्रकार उपलब्ध असल्याने ग्राहकांमध्ये विविधतेने खरेदीचा ओघ दिसून येत आहे.
गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी करण्यासाठी नागरिक आणि गणेश मंडळे अत्यंत उत्साहात आहेत.








