यवत पोलीसांकडुन नांदूर येथील गिटस् कंपनी मधील तांब्याची केबल चोरी करणारा आरोपी जेरबंद.
०१ लाखाचा मुद्देमाल जप्त.
दौंड प्रतिनिधी | अनिल गायकवाड.
यवत पोलीस स्टेशन ठाणे हद्दीतील मौजे नांदुर ता.दौंड जि.पुणे गावचे हद्दीत गिट्स कंपनी मधील एकुण ९४ हजार रूपये किंमतीच्या वेगवेगळया आकाराच्या तांब्याचे केबल चोरी गेल्याने यवत पोलीस ठाणे येथे दिनांक ०२/०९/२०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाच्या तपासा करीता तात्काळ पोलीस पथक तयार करून अज्ञात आरोपीचा सी.सी.टी.व्ही. फुटेज आधारे शोध घेतला असता सदर केबल चोरी ही इसम नामे सागर बिभिषण जाधव, वय २५ वर्षे, व्यवसाय मजुरी, सध्या रा.तुपेवस्ती, ता. हवेली जि.पुणे,मुळ रा.सहजपुर ता.दौंड जि.पुणे याने
केल्या असल्याची खात्रीशिर माहिती पोलिसांना प्राप्त झाल्याने आरोपीस ताब्यात घेवुन गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता सदर आरोपीने गुन्हा केला असल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यास अटक करून गुन्हयाचे तपासादरम्यान एकुण ६० हजार रुपये किंमतीच्या तांब्याच्या केबल व गुन्हा करतेवेळी वापरलेली मोटार सायकलसह असा एकुण १ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दाखल गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस. हवालदार. रविंद्र मोहिते करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांचे मार्गदर्शनाखाली यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड, पोलीस. हवालदार. संदिप देवकर, पोलीस हवालदार. रॉकी देवकाते, पोलीस कॉ. धिरज जाधव, पोलीस कॉ.प्रतिक जगताप, पोलीस कॉ.अमोल भुजबळ, पोलीस कॉ. सचिन गुंड, पोलीस कॉ. दिनेश लोणकर, व पोलीस कॉ. विनित कुऱ्हाडे यांनी केलेली आहे.








