सार्वजनिक पैशांचा चुराडा ? चिखली फाटा–पाटोदा रस्त्याच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह !
किनवट प्रतिनिधी- मार्कंडेय सिरमवार
किनवट : चिखली फाटा ते पाटोदा या महत्त्वाच्या ब्रँच रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचे उघडकीस आले आहे. रस्ता पूर्ण होऊन अवघे काही दिवस लोटत नाही तोच डांबर उखडू लागल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षमतेवर आणि कंत्राटदाराच्या मनमानी कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार किनवट तालुक्यातील चिखली ते पाटोदा हा रस्ता सामरिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे कॅनॉट शहराचे अनेक गावांचा संपर्क या रस्त्यावरून होतो त्यामुळे रोज शेकडो नागरिक या रस्त्यावरून ये जा करत असतात परंतु गत काही दिवसांपासून रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे परिसरातील नागरिकांच्या दीर्घ मागणीनंतर हा रस्ता नव्याने बांधणी करण्यात आला परंतु नवीन झालेला रस्ता हा भ्रष्टाचाराच्या बळी पडला आहे बांधकाम विभागाचे कर्मचारी आणि संबंधित कंत्राटदार यांच्या अर्थपूर्ण लागेबंधातून रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट झाल्याचे आरोप होत आहे डांबरीकरण पूर्ण झाल्यानंतर अलपावधीतच रस्ता उखडला असून, खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.मार्गावरील पुलांचे बांधकाम अपूर्ण असल्याने दररोज किरकोळ व गंभीर अपघात होत आहेत.
जनतेच्या करातून जमा होणाऱ्या निधीचा गैरवापर होत असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. एकही पावसाळा सहन न करू शकणारा रस्ता यामुळे कंत्राटदाराने निकृष्ट सामग्रीचा वापर केल्याचे उघड होत असल्याने जनतेमध्ये चांगलाच रोष पसरला आहे रस्त्यावरून इजा करणे जोखमीचे ठरत असून जनतेचा कराचा पैसा अक्षरशः खड्ड्यात गेल्याची प्रतिक्रिया जनतेमधून होत आहे तर संबंधित
कंत्राटदाराचे परवाना रद्द करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.रस्त्याच्या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप करत परिसरातील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, रस्त्यावरील पुलांचे कामामध्ये प्रशासनिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या परवानगीशिवाय निकृष्टपणा येणारच नाही त्यामुळे संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारीही निकृष्ट कामाला तेवढेच जबाबदार असल्याचं आरोप करत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे बांधकाम अर्धवट अवस्थेत सोडल्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना नको त्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
अनेक जण खड्ड्यांमुळे आणि पुलांच्या कठड्यांअभावी अपघातात जखमी झाले आहेत.
नागरिकांच्या प्रमुख मागण्या
झालेल्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी आणि कंत्राटदारावर कारवाई करावी.अपूर्ण पुलांचे बांधकाम आणि उखडलेल्या रस्त्याची त्वरित पुनर्बांधणी करण्यात यावी.
सार्वजनिक निधीचा अपहार करणाऱ्या संबंधित गुत्तेदाराचे लायसन्स तत्काळ रद्द करावे.
संबंधित विभागाने या गंभीर बाबीची तातडीने दखल न घेतल्यास परिसरातील नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.








