जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ माहूर शहर कडकडीत बंद
प्रतिनिधी. // अंबादास मुकटे // माहूर
मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे गेल्या 14 दिवसापासून उपोषणाला बसले असून त्यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ माहूर शहर कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदला व्यापारी नागरिक तसेच जरांगे पाटील यांच्या समर्थकांचा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले . जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी माहूर शहरातील कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी आंदोलन केले, यावेळी मराठा आरक्षणाच्या मागणीसह जरांगे पाटील यांच्या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलनाकाकडून करण्यात आले.बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख बाजारपेठ व व्यावसायिक आस्थापने बंद ठेवण्यात आले. आंदोलना दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी प्रशासनाकडून चोक पोलीस बंदोबस्त तन्यात करण्यात आला होता.याच दरम्यान जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून,शासनाने तातडीने तोडगा काढावा अशी भावना माहूर मधील आंदोलन कर्त्यानी व्यक्त केली. या आंदोलन दरम्यान मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते. व सरकार विरोधात घोषणाबाजी करत सरकार च्या विरोधात आपला रोस व्यक्त केला.








