देगलूर शिवसेना (शिंदे गट) तालुक्याची नवीन कार्यकारिणी जाहीर
डॉ. व्यंकट धुमाळे तालुका प्रमुख तर ज्योतीताई वरखींडे यांची महिला तालुका प्रमुखपदी निवड
विशेष प्रतिनिधी // मनोज बिरादार
…………………………………………………………..
शिवसेना (शिंदे गट) देगलूर तालुक्याची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, तालुकाप्रमुखपदी डॉ. व्यंकट धुमाळे यांची तर महिला तालुकाप्रमुखपदी ज्योतीताई वरखींडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देगलूर शिवसेनेच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे तालुक्यातील संघटनात्मक कामकाजाला अधिक बळ मिळणार असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
नवीन कार्यकारिणीनुसार विवेक सावरकार परकंटवार यांची तालुका संघटक, बाळू अण्णा काब्दे यांची देगलूर शहरप्रमुख, तर संगीता कदम यांची महिला शहरप्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे.
नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांना शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख व्यंकटराव पाटील खतगावकर आणि शिवसेना नेते अशोकराव पाटील राजुरकर यांच्या हस्ते अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी नव्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी तसेच जनतेच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक बालाजी पाटील खतगावकर यांनी नव्याने नियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास युवासेना जिल्हाप्रमुख नामदेव पाटील थडके, गंगाधर तमलुरकर, व्यंकट पुरमवार, ॲड. अंकुशराजे पाटील जाधव, ॲड. अशोक कापसे, अनुजा पाटील यांच्यासह शिवसेनेचे अनेक स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.








