शेतकऱ्याने खत मारणाऱ्या टबाने वाघाचा केला सामना
पोर्ला शेत शिवारातील थरार ! जखमी शेतकऱ्यावर उपचार .
चुन्नीलाल मोटघरे // गडचिरोली
पोर्ला : शेतातील पिकांना खत टाकण्यासाठी आपल्या मुलीसोबत शेतावर गेले असताना अचानक वाघाने शेतकऱ्यावर झडप घातली ,सोबतच आपल्या १७ वर्षीय मुली समोरच वाघाने हल्ला केल्याने काही क्षणभर थरार निर्माण झाला. मात्र प्रसंगावधान राखून मुलीने आरडाओरडीमुळे शेतकऱ्यांनी हातातील प्लास्टिकच्या डब्याने वाघाचा सामना केला .त्यामुळे वाघाने माघार घेत जंगलाच्या दिशेने धुम ठोकली.हि धक्कादायक घटना पोर्ला शेत शिवारात रविवारी दुपारी १:३० वाजेच्या सुमारास घडली.सुदैवाने शेतकऱ्याचे प्राण वाचले.परंतु या वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाला.
भाऊराव भगवान मशाखेत्री वय ४२ वर्षे रा. पोर्ला,असे वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.भाऊराव हे रविवारी सकाळी आपल्या शेतात धान पिकाला खत टाकण्यासाठी आपल्या मुली सोबत गेले होते.दुपारी थोडी विश्रांती घेण्यासाठी शेतात बसून होते.दरम्यान दरम्यान दुपारी १:३० वाजता च्या सुमारास दबा धरून बसलेल्या वाघाने भाऊराव यांचेवर अचानक झडप घातली . समोर साक्षात वाघ दिसताच जवळच उभ्या असलेल्या मुलीने मोठ्याने आरडाओरड केली.भाऊराव क्षणाचाहि विलंब न करता सावध होऊन खत टाकणाऱ्या प्लास्टिक च्या टपाने वाघाचा सामना करु लागला.त्यामुळे वाघ धुम ठोकत जंगलात पळून गेला.
अशा धाडसी प्रतिकारामुळे वडील व मुलगी या दोघांचा जीव वाचला.
या झटपटीत भावराव यांच्या डाव्या हाताच्या काही बोटांना तसेच दोन्ही हाताच्या भुजांवर वाघाच्या पंजांमुळे जखमी झाल्या त्यांना तातडीने पोर्ला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रेपर करण्यात आले. डॉक्टरनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले . वनक्षेत्रा अधिकारी राजेंद्र पंचभाई यांनी घटनेला दुजोरा देत पोर्ला वनपरिक्षेत्रातील जगलालगतच्या शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी वन्यप्राण्यांच्या हालचाली बाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हातातील साधा प्लास्टिक चा टब त्या क्षणी भाऊराव यांच्यासाठी जीव वाचवणारे शस्त्र ठरले. मुलींसोबत आलेल्या संकटात त्यांनी दाखविलेल्या धाडसाला सलाम ..! वडील व मुलगी दोघांही मोठ्या संकटातून बचावले. त्यांच्या हिंमतीला दाद दिली पाहिजे.








