शिर्शी परिसरात रानटी हत्तींचा धुमाकूळ : शेतीचे अतोनात नुकसान
वन विभागने वाढीव नुकसान भरपाईचे प्रस्ताव तयार करावे
चुन्नीलाल मोटघरे // गडचिरोली
आरमोरी तालुक्यात मागील काही वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या रानटी हत्तीच्या कडपाने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालुन नासधूस करण्याचा जणू एक प्रकारे विक्रम कायम असून दि.११ सप्टेंबर च्या रात्रौ शुक्रवार ला ३० च्या संख्येतील रानटी हत्तींनी शिर्शी वनक्षेत्राअंतर्गंत शेत शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतींची जवळपास ८ ते ९ हेक्टरातील धान पिकांची पुर्णंता नासधूस करून अतोनात नुकसान केली आहे.यात गंगाधर कुलसंगे, भरत कुलसंगे, सुशीला सराटे, पुरुषोत्तम कुमरे ,सुखदेव पेंदाम, जयदेव पेंदाम ,वासुदेव पेंदाम, नीलकंठ पेंदाम, दयाराम पेंदाम, तुळशीराम सलामे, अंतराम राऊत, भास्कर मडावी, यांच्या धान पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान करून त्यांच्या पुढे संकटच उभे केले आहे.
गेल्या चार वर्षांपासून ओडीसा राज्यातील रानटी हत्तींनीचा कडप छत्तीसगड मार्गे गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश केला होता.या हत्तींनी कोरची,कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली,धानोरा, इत्यादी तालुक्यातील उभी धान, मका, पिके पायदळी तुडवली आहेत.आणि कित्येक हेक्टर क्षेत्रातील पिकांची या रानटी हत्तींनी नष्ट केली आहेत.अनेक जणांचे बळी घेतले आहे.तर काही जणांना जखमी केले आहे.आता आरमोरी तालुक्यातील शिर्शी वनक्षेत्राअंतर्गंत येणाऱ्या शेत शिवारात दाखल होऊन ८ ते ९ हेक्टर धान पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान केली आहे.
शेतकरी बांधव अगोदरच हवालदिल झाले आहेत.यातच रानटी हत्तीच्या कडपांकडून वारंवार शेतीची नासधूस केली जात असल्याने शेतकऱ्यांनी उसनेवार करून ,कर्ज घेऊन धान पिकाची लागवड केली आहे.परंतु आता झालेल्या शेतीची नासधूस बघून मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
शिर्शी वनक्षेत्राअंतर्गंत शेत शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतींची मोठ्या प्रमाणात रानटी हत्तींनी धुमाकूळ घालून नुकसान केल्याची माहिती प्राप्त होताच भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे मंडळ सदस्य तथा महाराष्ट्र राज्य किसान सभेचे कार्याध्यक्ष काॅ.डाॅ.महेश कोपूलवार यांनी शिर्शी वनक्षेत्राअंतर्गंत येणाऱ्या शेत शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतीची प्रत्यक्षात पाहणी केली असता यात शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे तात्काळ सर्व्हे करून नुकसान भरपाईचे प्रती एकरी १ लाख रुपये देण्यात यावे, तसेच शेती साहित्यांची मोडतोड खर्च किंमतीच्या आधारावर वन विभागाने तातडीने मंजूर करावे ,अशी मागणी शिर्शी वनक्षेत्राधिरी आर.टी. समर्थ, व वनरक्षक वाडके यांनी आपल्या वरिष्ठांना कडवावे असे सांगण्यात आले. या रानटी हत्तींचा कायमचा बंदोबस्त,व शेतकऱ्यांना वाढीव नुकसान भरपाई मिळण्या संबंधात माननिय वनमंत्री, महाराष्ट्र शासन यांना त्वरित निवेदन पाठवण्यात येणार आहे. यावेळी सुरेश फुकटे , चुन्नीलाल मोटघरे, प्रशांत कोपुलवार, नुकसानग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








