शफीक शेख, उपसंपादक पिंपरी चिंचवड
पिंपरी, दि.१३ :– अंधश्रध्दा निर्मुलन व सामाजिक एकतेसाठी तसेच स्त्री-पुरुष समानता यासाठी संपुर्ण आयुष्य व्यतीत थोर समाजसुधारक चक्रधरस्वामी यांची जयंती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज साजरी करण्यात आली.
महानगरपालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर यांनी पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील श्री चक्रधरस्वामी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच महानगरपालिकेच्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
चक्रधरस्वामीं यांनी आपल्या जीवनातून साधेपणा, अध्यात्म, भक्ती यांसह अंधश्रध्दा निर्मुलन,समाजातील समता व मानवतेचा संदेश दिला,त्यांचे व्यापक विचार आजही तितकेच मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरतात.








