आमदार भीमरावजी केराम यांच्या निवासस्थानी श्री गणरायाचे भक्तिभावाने स्वागत..
किनवट प्रतिनिधी – मार्कंडेय सिरमवार
किनवट दि. १५ सप्टेंबर २६ : गणेशोत्सवाच्या मंगलमय पर्वाला सुरुवात होत असताना लोकप्रिय आमदार भीमरावजी केराम साहेब यांनी आपल्या निवासस्थानी श्री गणरायाचे भक्तिभावाने स्वागत करून विधिवत पूजन केले. यावेळी श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना करताना, “गणरायाच्या आगमनाने प्रत्येकाच्या घरात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंद नांदो. सर्वांच्या जीवनात शांतता व समाधान लाभो,” अशी मनोकामना व्यक्त करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने भक्तिमय वातावरणात गणरायाचे स्वागत करण्यात आले. गणपती बाप्पा मोरया !’च्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला.








