भारतीयांनी संविधानिक मूल्यांची जोपासना करावी : इंजि.डॉ. एम एम भरणे.
कुलदीप गायकवाड | प्रतिनिधी | परभणी |
सरफराज नगर परभणी येथील धम्मदेशना महिला मंडळाने आयोजित केलेल्या बुद्ध विहार येथील वर्षावास कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभा परभणी जिल्हा अध्यक्ष इंजि डॉ एम एम भरणे व आद बाबासाहेब धबाले राज्य सचिव प्रचार व पर्यटण यांनी दि 2 सप्टेंबर 2026 रोजी दु 2.00 भेट देऊन भारतीय बौद्ध महासभा जिल्हा परभणीच्या वतीने धम्मदेशना महिला मंडळास भ बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ भेट दिला.वर्षावास मालिकेतील , डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे या देशासाठी योगदान* या विषयावर इंजि डॉ एम एम भरणे यांनी मार्गदर्शन केले.या देशाचे संविधान लिहून समता, स्वातंत्र्य, बंधुभाव व न्याय ही लोकशाहीची बहुमूल्य तत्व या देशाला समर्पित करून भेद भावाचे उच्चाटन केले व समतेचे राज्य निर्माण केले. हे या देशासाठी दिलेले बहुमोल योगदान असल्याचे सांगून प्रत्येक भारतीयांनी सविधानीक मूल्यांची जोपासना करावी असे प्रतिपादन इंजि डॉ एम एम भरणे यांनी केले.तसेच आद बाबासाहेब धबाले राज्य सचिव प्रचार व प्रयटण यांनी भैय्यासाहेब आंबेडकर यांचे कार्य हा विषय सविस्तर मांडला व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले . या प्रसंगी प्रथम भ.बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्यांचे हस्ते करण्यात आले व सर्वांनी त्रीसरण् पंचशील ग्रहण केले.धम्मदेशना महिला मंडळाच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.आयुषमती प्रयाग बाई ननावरे दररोज दु 2.00 वा ग्रंथ वाचन करीत आहेत.सुत्रसंचलन विजयमाला पुंडगे यांनी तर आभार प्रदर्शन सुनंदा हारभरे यांनी केले
भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आद डॉ भीमरावजी आंबेडकर यांच्या आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्यात वर्षावास प्रवचन मालिका राबविण्यात येत आहे. या प्रसंगी धम्म श्रवणासाठी धम्मदेशना महिला मंडळाच्या त्रीशला बलखंडे, विमलताई भगत,पुंडगे,रत्नमाला डाके, वैशाली भगत, सोनाली पुंडगे इत्यादी बहुसंख्य उपस्थित होते.शेवटी सरणतय घेऊन कार्यक्रम संपन्न झाला.








