आटाळे येथे समता सैनिक दलाची कॉर्नर प्रचार सभा उत्साहात संपन्न
चक्रधर महाले ( भुसावळ प्रतिनिधी )
दिनांक १६ सप्टेंबर २६ : अमळनेर तालुक्यातील आटाळे गावात समता सैनिक दलाच्या वतीने कॉर्नर प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत समता सैनिक दलाचे महाराष्ट्र राज्य सचिव विजय निकम यांनी उपस्थितांना समता सैनिक दलाच्या स्थापने पासूनच्या ऐतिहासिक कार्याची, संघटनेच्या तत्त्व-विचारांची आणि ध्येय-उद्दिष्टांची सविस्तर माहिती दिली.
आजच्या सामाजिक परिस्थितीत समता सैनिक दलाची आवश्यकता का आहे, तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या या संघटनेला अधिक सक्षम व व्यापक करण्याची जबाबदारी प्रत्येक आंबेडकरवादी कार्यकर्त्याची आहे, याचे महत्त्व विजय निकम यांनी उपस्थितांच्या निदर्शनास आणून दिले.
अनिता कापुरे , बापू पाथरवट, अनिता नन्नवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कॉर्नर सभेच्या आयोजन धरणगाव तालुका प्रचारक संगीता शिरसाठ यांनी केले होते.
सभेला गावातील सुरेश, सैदाने, मधुकर सैदाने, संगीता मोरे, माया सैंदाणे, दिपाली सैंदाणे, उषा सैंदाणे, भारतीय सैन्याने, रीना सैंदाणे, मंगल सैंदाणे, जिजाबाई सैंदाणे, मायाबाई सैंदाणे, लक्ष्मीबाई सैंदाणे, कल्पनाबाई फेल, सुनंदाबाई अहिरे, मधुकर सैंदाणे व सोनम भिल्ल यांनी सहभाग नोंदविला.
यावेळी उपस्थितांनी समता सैनिक दलात सक्रियपणे कार्य करण्याचा आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेले समता सैनिक दल अधिक मजबूत करण्यासाठी आपले योगदान देण्याचा सामूहिक निश्चय केला.








