पुणे जिल्हा सॅम्बो चॅम्पियनशिप २०२६-२७ चा उद्घाटन सोहळा यवत येथे उत्साहात संपन्न.
दौंड प्रतिनिधी | अनिल गायकवाड.
दिनांक १५ सप्टेंबर २६ : दौंड तालुक्यातील मौजे यवत, ता.दौंड, जि.पुणे. सॅम्बो असोसिएशन पुणे आयोजित व स्पोर्ट्स सॅम्बो असोसिएशन (महाराष्ट्र) संलग्न पुणे जिल्हा सॅम्बो चॅम्पियनशिप २०२६-२७ स्पर्धेचे उद्घाटन सोहळा दि १३ सप्टेंबर २०२६ रोजी यवत पालखी स्थळ या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला
या स्पर्धेचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा सौ.कांचनताई कुल यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी सर्व खेळाडूंना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या व सॅम्बो खेळाच्या वाढीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
ही सॅम्बो चॅम्पियनशिप स्पर्धा पालखी स्थळ हॉल, बाजार मैदान, यवत,ता.दौंड येथे आयोजित करण्यात आले होते. ही स्पर्धा सर्व स्तरीय मान्यताप्राप्त असल्याचे आयोजकांनी सांगितले.
दौंड पंचायत समितीचे विद्यमान सभापती सुखदेव चोरमले. पुणे जिल्हा परिषद सदस्य अविनाश कुदळे. यवत गावचे सरपंच प्रशासक समीर दोरगे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या वेळी सॅम्बो संघटनेचे मान्यवर उपस्थित होते.
कुमार उगाडे सचिव, स्पोर्ट्स सॅम्बो असोसिएशन महाराष्ट्र. नासिर झफर खान टेक्निकल डायरेक्टर, महाराष्ट्र विशाल कांबळे आंतरराष्ट्रीय सॅम्बो खेळाडू (इंडिया, महाराष्ट्र, पुणे) प्रवीण कलबी राष्ट्रीय खेळाडू, पुणे. सुशांत सरक सिव्हिल डिफेन्स हर्षद भगत नॅशनल रेफ्री व राष्ट्रीय खेळाडू, पुणे तसेच नुकत्याच झालेल्या एशिया आणि ओशियाना सॅम्बो चॅम्पियनशिप मनिला, फिलिपिन्स २०२६ (दि.२३ ते २९ जून) मध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
या स्पर्धेचे संपूर्ण आयोजन सॅम्बो असोसिएशन पुणे येथील विशाल कांबळे सर, आंतरराष्ट्रीय खेळाडू, इंडिया यांनी केले असून सॅम्बो स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.








