किनवट तालुक्यातील बोधडी सर्कलमध्ये शिवसेना (उबाठा ) पक्षाचे नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती..
संघटन बळकटीवर भर
किनवट प्रतिनिधी (मार्कंडेय सिरमवार )
किनवट : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख ज्योतिबा दादा खराटे यांच्या सूचनेनुसार व युवानेते करणभाऊ एंडलवार यांच्या नेतृत्वाखाली आज दि. 15 सप्टेंबर 2026 रोजी किनवट येथे नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
शिवसेना तालुकाप्रमुख मारोती दादा दिवसे पाटील यांच्या हस्ते व युवासेना तालुकाप्रमुख अतुलभाऊ दर्शनवाड, नगरसेवक तथा शिवसेना शहरप्रमुख प्रशांतभाऊ कोरडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बोधडी सर्कलमधील नवनियुक्त शाखा प्रमुखांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
नवनियुक्त पदाधिकारी पुढीलप्रमाणे अडेलू शामराव चपलवाड शाखा प्रमुख पार्डी (खु), बालाजी गोविंद परसेवाड शाखा प्रमुख येंदा, रमेश इंद्रजीत पडवळ शाखा प्रमुख नागसवाडी, संजय रावसिंग कटारे शाखा प्रमुख, प्रेमसिंग तांडा (बोधडी), संतोष विष्णू वाघाडे शाखा प्रमुख बोधडी (ख), क्रिष्णा विश्वनाथ बैलवाड शाखा प्रमुख कोपरा, संजीव बामनाजी मामिलवाड शाखा प्रमुख येंदा,
यावेळी मार्गदर्शन करताना तालुकाप्रमुख मारोती दिवसे पाटील म्हणाले की, वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने वाटचाल करीत, पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची ध्येय-धोरणे गावागावात, घराघरात पोहोचवावीत व शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्परतेने कार्य करावे.
या कार्यक्रमास बोधडी बु. सर्कल प्रमुख सचिन बोरेनवाड, शंकर राजाराम मुंडे, संतोष रमेश हातमोडे, उमेश पुराजी हिरापुरे, गंगाराम परसराम पिलबंड, प्रकाश देवानंद घामेवाड, मारोती धरमा गाठे, राजेश नारायण चंचलवाड व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.








