आनंद तुपदाळे यांना ‘मराठवाडा रत्न पुरस्कार २०२६’ने सन्मानित
समाजकार्य व सार्वजनिक सेवेतील उल्लेखनीय योगदानाची दखल; नांदेड जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव
अंबादास मुकटे, | माहूर ता. प्रतिनिधी
समाजकार्य आणि सार्वजनिक सेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे माहूर येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस समितीचे तालुकाध्यक्ष आनंद गंगाधर तुपदाळे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची प्रतिष्ठित ‘मराठवाडा रत्न पुरस्कार २०२६’ या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
मीडिया पार्टनर समाचार वाणी न्यूज यांच्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळ्यात १२ सप्टेंबर २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे तुपदाळे यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्यासह केंद्र व राज्य शासन, बँकिंग, आरोग्यसेवा, मीडिया तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
समाजहिताच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग, सार्वजनिक सेवेतील योगदान आणि सामाजिक बांधिलकी या कार्याची दखल घेत तुपदाळे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
या पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव तसेच प्रसिद्ध चित्रपट अभिनेते-अभिनेत्री, उद्योजक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद व व्यावसायिक भेटीचे आयोजन करण्यात आले होते.
आनंद गंगाधर तुपदाळे यांना ‘मराठवाडा रत्न पुरस्कार २०२६’ मिळाल्याबद्दल नांदेड जिल्ह्यासह माहूर तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.








