आंदोलन संदर्भात वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष शंकर महाजन बिलोली पोलीस स्टेशन येथे नजर कैदेत
मारोती एडकेवार | मारोती एडकेवार
नांदेड : एस सी एसटी आदिवासी यांचा बजेट लाडक्या बहिणीकडे वळवल्याच्या, निषेधार्थ एससी, एसटी, आदिवासी, मंत्री यांच्या विरोधात यवतमाळ, येथे वंचित बहुजन आघाडी कडून मोर्चा काढण्यात येत होता, त्या मोर्चाला नांदेड जिल्ह्यातील वंचित चे जिल्हा अध्यक्ष शंकर महाजन साहेब व प्राध्यापक राज आटकोरे साहेब, जिल्हाध्यक्ष यांना राहत्या घरून सकाळी 6:30 वाजता,बिलोली पोलीस स्टेशनचे पीआय बाळासाहेब रोकडे यांनी सगरोळी येथे येऊन,शंकर महाजन साहेब यांना नजर कैदेत ठेवण्यासाठी बिलोली पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले, ही बातमी वाऱ्यासारखी व्हायरल झाल्याच्या नंतर,वंचित बहुजन आघाडीचे बिलोली तालुक्यातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी,यांनी तात्काळ बिलोली स्टेशन गाठण्यात आले बिलोली पोलीस स्टेशन, येथे कार्यकर्त्यांची गर्दी पाहता व वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र दादा पातोडे,यांनी दखल घेऊन संबंधित नांदेड जिल्ह्याचे एसपी साहेब यांच्याशी, व बिलोली पोलीस स्टेशनचे पीआय यांच्याशी फोन द्वारे माहिती घेण्यात आली, व बिलोली पोलीस स्टेशनचे पीआय बाळासाहेब रोकडे यांनी,संबंधित कार्यकर्त्यांचे रोष पाहता सकाळी 11:00 वाजता वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर महाजन साहेब, यांना समक्ष नोटीस बजावून,यांची नजर कैदेतून सुटका करण्यात आली, यावेळी उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष धम्मदीप गावंडे,माजी महासचिव गजानन चिंतले, व महाजन साहेबांचे विश्वासू व वंचित तालुका सदस्य पत्रकार मारोती एडकेवार, रिपब्लिकन सेनेचे तालुकाध्यक्ष गंगाधर इबितकर, कारला खुर्द ग्रामपंचायत सदस्य मारोती कांबळे, ममदापूरचे माजी उपसरपंच शिवा शिवशेटे,
वंचित गणप्रमुख गौस इनामदार, वंचित बहुजन आघाडीचे हिप्पारगा थडी येथील कार्यकर्ते मुज्जू भाई सय्यद,दीपक एडकेवार, साहेबराव एडकेवार,शबर पटेल,व वंचित बहुजन आघाडी सगरोळी सर्कल प्रमुख शिवाजी विचारे,व असंख्य कार्यकर्ते बिलोली पोलीस स्टेशन येथे उपस्थित होते.








