अ ब ब चोरांवर लक्ष ठेवण्यासाठी लावलेले सीसी टीव्ही कॅमेरेच चोरांनी चोरले
संदीप जाधव | टाकळी भान
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की टाकळीभान येथे नेवासा रोडवर राजेश तगरे हॉटेल किंग पॅलेस परमिट रूम बिअरबार आहे .तेथे सतत ग्राहकांची वर्दळ असते त्यांचे वाहने व हॉटेलच्या सुरक्षेसाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत.त्यापैकी दोन कॅमेरे दिनांक 15. 9 .2026 चे पहाटे दीड ते दोन वाजल्याचे सुमारास चोरून नेले त्याबाबत हॉटेलचे चालक करण तगरे यांनी तालुका पोलीस स्टेशन श्रीरामपूर येथे फिर्याद दाखल केली आहे .त्यानुसार भारतीय न्याय संहिताचे कलम 303(2) नुसार गुन्हा दाखल केला आहे.सुरक्षेसाठी लावणारे सीसीटीव्ही चोरांनी चोरून नेल्यामुळे व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे .या घटनेचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नवनाथ बर्डे हे करीत आहेत.








