गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी जि. प.शाळांचे ज्ञानदान कौतुकास्पद : डॉ.श्रावण रॅपणवाड
ओबीसी नेते विश्वनाथराव कोलमकर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त केंद्रीय प्राथमिक शाळेत पंख्यांचे वाटप.
मनोज बिरादार | मुखेड ता. प्रतिनिधी
खाजगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता टिकवून ठेवण्याचे आणि ती वाढवण्याचे काम शिक्षक वृंद अत्यंत निष्ठेने करत आहेत.स्पर्धेच्या या युगात गोरगरीब विद्यार्थ्यांना दिले जाणारे हे मोफत ज्ञानार्जन खरोखरच कौतुकास्पद असून विद्यार्थ्यांना न्याय देणारे ठरत आहे,असे प्रतिपादन डॉ. रॅपणवाड यांनी केले.
ओबीसी नेते विश्वनाथराव कोलमकर यांच्या ७५ व्या (अमृत महोत्सवी) वाढदिवसाचे औचित्य साधून मुखेड शहर काँग्रेसच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला व पुढील दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.या सामाजिक उपक्रमाचा एक भाग म्हणून येथील केंद्रीय प्राथमिक शाळेला छताच्या पंख्यांचे वाटप करण्यात आले.या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात डॉ.रॅपणवाड मनोगत व्यक्त करत होते.कोलमकर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी असा समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे भाग्य मुखेड काँग्रेस टीमला मिळाले,असे सांगत त्यांनी सर्व शिक्षक वृंदाचे आभार मानले.
कार्यक्रमा दरम्यान केंद्रीय प्राथमिक शाळेच्या वतीने मुख्याध्यापक एस.एन.कोडगिरे यांनी विश्वनाथराव कोलमकर यांचा अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त सत्कार केला.डॉ.श्रावण रॅपणवाड यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या टीमने शाळेला दिलेली ही उपयुक्त भेट वस्तू कायम स्मरणात राहील,अशा शब्दांत मुख्याध्यापक कोडगिरे यांनी कृतज्ञता व्यक्त करून उपस्थितांचे आभार मानले.
या प्रसंगी काँग्रेस शहराध्यक्ष हणमंत नारनाळीकर,तालुका कार्याध्यक्ष संभाजी पाटील उंद्रीकर,काँग्रेस ओबीसी शहराध्यक्ष प्रकाश निमलवाड,शहर उपाध्यक्ष बालाजी वाडेकर,इरफान मोमीन,वलीयोद्दीन शेख,एजाज शेख,बालाजी छट्टेवाड,वडगावकर सर ग्याजलवाड सर यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.








