खंडाळे ग्रामपंचायत सेवा संकल्प अभियान २०२६ चा शुभारंभ….
चक्रधर महाले | भुसावळ प्रतिनिधी
दिनांक : १७ सप्टेंबर २०२६ रोजी ग्रामपंचायत खंडाळे तालुका भुसावळ येथे सेवा संकल्प अभियानचा अत्यंत उत्साहात शुभारंभ करण्यात आला. हे अभियान १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात चालू करण्यात आले आहे.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस 17 सप्टेंबरला असल्याने आणि त्यांच्या सार्वजनिक जीवनातील 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शासन स्तरावरून विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहे.जळगाव जिल्हा परिषदेच्या मा. मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर मा. मुख्य लेखा वित्त अधिकारी शबाना शहा आणि भुसावळ पंचायत समितीचे गट विकास अधिकारी डॉ. कुलदीप ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अभियानाचे उद्घाटन झाले. अभियानाच्या रूपरेषेनुसार गावातील गरजू नागरिकांना विविध प्रकारच्या आवश्यक शासकीय दाखल्यांचे थेट जागेवर वाटप करण्यात आले. या अभियानांतर्गत प्रशासकीय पारदर्शकता आणि गतिमानता यावर भर देण्यात आला. मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी खंडाळे गावातील विविध विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी केली.त्यांनी स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि अंगणवाडी केंद्रास भेट दिली. आणि सोयीसुविधांची बारकाईने तपासणी केली व अंगणवाडी मधील पोषण आहाराची स्वतः चव घेऊन गुणवत्ता तपासणी केली अंगणवाडीमध्ये मुला मुलींच्या पालकांची उपस्थिती कमी असल्याचे दिसून आल्याने त्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जिल्हा परिषद मराठी शाळेतील मुला मुलींच्या वैयक्तिक शौचालयात पाण्याची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे किंवा नाही याचीही त्यांनी प्रत्यक्ष खात्री केली शाळा परिसर हरित व सुंदर बनवण्यासाठी प्रसंगी शाळा परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात आले. तसेच ज्या लाभार्थींची घरकुले मंजूर आहेत त्यांनी ती त्वरित सुरू करावी. तसेच गावातील सोयी सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी नियमित कर भरणा करावा असे आग्रही आव्हान त्यांनी खंडाळेवासियांना केले.सदर कार्यक्रमास मुख्यमंत्री फिलोशीप मधील कार्यरत असलेले तरुण तेजस जोशी, अथर्व कुलकर्णी,साई नेवासे,आणि श्रेया दीक्षित प्रामुख्याने उपस्थित होते.याशिवाय कार्यक्रमाला विस्तार अधिकारी (पंचायत)श्री गौतम आधार वाडे गटशिक्षणाधिकारी श्री.किशोर वायकोळे तत्कालीन सरपंच सौ मीराबाई पाटील व प्रशासक श्री सुनील मोरे श्री ऋषिकेश चौधरी ग्रामपंचायत अधिकारी यांच्यासह तालुका व ग्राम स्तरावरील विविध अधिकारी कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी गौतम वाडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार गटशिक्षणाधिकारी श्री.किशोर वायकोळे यांनी मानले सेवा संकल्प अभियान 2026 च्या माध्यमातून खंडाळे गावाच्या विकासाला आणि प्रशासकीय कामांना मोठी गती मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.








