जळकोट येथील शेतकऱ्यांनी फिरवला १४ एकर सोयाबीन वरती रोटावेटर …
जळकोट प्रतिनिधी | विजय पिसे
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील अभिजीत बसणअप्पा कवठे या शेतकऱ्याने आपल्या शेतातील १४ एकर वरील सोयाबीन पिकावरती फिरवला रोटावेटर निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीराजा पुन्हा एकदा हवालदिल झाला आहे. पावसाने अक्षरशः दोन महिन्यापासून दडी मारल्याने पाण्याचा एक थेंबही पडला नाही त्यामुळे पिक वाडीच्या काळात पाणी नसल्यामुळे शेतकरी राजा मोठ्या संकटात सापडला आहे. कर्ज काढून 14 एकर सोयाबीन पेरण्यासाठी एक लाख 50 हजार रुपये खर्च करून पेरणी नंतर सोयाबीनचे पीक व्यवस्थित उगवलेच नाही. आणि जे थोडेफार उगवले, त्याला पाण्याचा तीज ताण सहन करावा लागला सिंचनाची सोय नसल्याने आणि गेल्या अनेक दिवसातून पाऊस पूर्णपणे लांबल्याने हातबल शेतकऱ्याने काळजावर दगड ठेवून आपल्या डोळ्यासमोर 14 एकर शेतातील सोयाबीन पिकावर ना ईलाजाने रोटावेटर फिरवण्याची अत्यंत दुर्देवी वेळ आली आहे. कर्ज काढून खर्च करूनही पीक वाया गेल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.व परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात ही अशीच परिस्थिती असून सोयाबीन, तूर, उडीद, मूग यासारखी पिके पाण्याअभावी मान टाकून करपत चालले आहेत. यामुळे पिकावर रोटावेटर चालवताना या अन्नदात्याच्या डोळ्यात आलेले अश्रू आणि शेतात उध्वस्त झालेली पिके पाहून शासनाने या संकटातून सावरण्यासाठी लवकरात लवकर तातडीने पंचनामे करून पीक विम्याची रक्कम आणि दुष्काळी अनुदान तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.








