वर्षावास निमित्त वाई बाजार येथील पंचशील बुद्ध विहारात ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथाचे वाचन,
सुभाष खडसे | माहूर प्रतिनिधी
माहूर तालुक्यातील वाई बाजार येथील पंचशील बुद्ध विहार येथे वर्षावासानिमित्त धार्मिक व धम्म उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे सामूहिक वाचन करण्यात येत आहे.
वर्षावासाच्या काळात उपासक-उपासिका व धम्मप्रेमी बांधवांनी नियमितपणे विहारात उपस्थित राहून ग्रंथाचे वाचन व श्रवण करावे,व भगवान बुद्धाच्या विचारांचा दैनंदिन जीवनात अंगीकार करावा असे आवाहन ग्रन्थ विश्लेषक आयु, मिलिंद कंधारे सर, भा,बौ,म, सभा माहूर तालुका अध्यक्ष ऍड, छंदक वाठोरे यांनी केले आहे,
या उपक्रमातून भगवान बुद्धांचा धम्म, पंचशील, अष्टांगिक मार्ग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धम्मविषयक विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. वर्षावासानिमित्त आयोजित या धम्म उपक्रमाला,रमाई महिला मंडळाच्या सदस्यां तसेच पंचशील बुद्ध विहार समिती अध्यक्ष प्रल्हाद खडसे, दिलीप पठाडे, पत्रकार सुभाष खडसे,सिद्धार्थ पारध्ये,अनाथपिंडक कंधारे, युवा पत्रकार अविनाश पठाडे, सागर खडसे, गौतम खडसे, सुमेध खडसे, यश खडसे, सिद्धार्थ खडसे,अजय खडसे, सम्यक खडसे, संदेश खडसे, नमीत खडसे, दीपक खडसे, प्रफुल खडसे, विशाल खडसे, सुजात वाठोरे, रोहन पारध्ये,आदी उपासक उपाशीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे








