छप्परबंद या जातीच्या व्यक्तींना विशेष मोहीम राबवून जाती प्रमाणपत्र वितरीत करा…
राष्ट्रीय शाह समाज महासभा, भारत संघटनेची निवेदना द्वारे मागणी..
उज्वल जैस्वाल | बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
बुलढाणा – छप्परबंद (मुस्लीम धर्मीयांसह) या जातीच्या व्यक्तींना विशेष मोहीम राबवून जाती प्रमाणपत्र वितरीत करण्यात यावे अशी मागणी आज गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर 2026 रोजी राष्ट्रीय शाह समाज महासभा भारत संघटनेची निवेदना द्वारे जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या कडे केली आहे. यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमुद आहे. की, महाराष्ट्र शासन, महसूल विभाग, शासन परिपत्र क्र. संकीर्ण- २०२६/प्र.क्र. १३७/आस्था-०१ (ई-१८२९१९३), दि.१५ सप्टेंबर २०२६
शासन परिपत्रकान्वये राज्यशासनाने “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता” या अभियानाअंतर्गत राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरीकांना शासनाच्या विविध योजनांचा व प्रमाणपत्राचा लाभमिळण्या करीता “भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान” विशेष मोहिमः दि. २७, २८ व २९ सप्टेंबर २०२६ आयोजित करण्याबाबत शासनाने विशेष मोहिम जिल्हा प्रशासनास राबविण्याच्या संदर्भात शासन परिपत्रक पारीत केले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील १३ तालुके व ०६ उपविभागामध्ये “छप्परबंद मुस्लीम धर्मीय” संमाजाचा समूह मोठ्या प्रमाणात वास्तव्याला आहे. त्यांना शासन परिपत्रक नुसार “छप्परबंद मुस्लीम धर्मीय” विमुक्त जातीचे प्रमाणपत्र या अभियाना अंतर्गत वितरीत करण्यात यावे अशी मागणी निवेदनाच्या अंती करण्यात आली आहे. निवेदनावर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के.जी.शाह. विदर्भ प्रमुख असलम शाह, जिल्हा प्रमुख शाहीद शाह, प्रसिद्धी प्रमुख सादीक शाह यांच्या स्वाक्षऱ्या आहेत यावेळी बुलडाणा व रायपुर येथील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.








