कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांना कर्ज द्या; अन्यथा २१ सप्टेंबरला तीव्र आंदोलन
उप जिल्हा प्रमुख महेश पाटील यांचा इशारा
देगलूर तालुका प्रतिनिधी/ संघपाल मदने
कर्जमाफीस पात्र असूनही केवळ संबंधित गाव बँकेच्या दत्तक गावांच्या यादीत नसल्याचे कारण पुढे करून अनेक वर्षांपासून बँकेकडून पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना नव्याने पीककर्ज देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे उपजिल्हाप्रमुख उपजिल्हाप्रमुख महेश पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संबंधित शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, अन्यथा स्टेट बँक ऑफ इंडिया देगलूर शाखेला २१ सप्टेंबर रोजी बँकेला टाळे ठोकून तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात येईल,असा इशारा त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया, देगलूर शाखेच्या शाखाधिकाऱ्यांना दिला आहे.
याबाबत अधिक शिवसेनेचे ,,जवाब दो॔ हे आंदोलन आक्रमक भूमिका घेत यशस्वीरित्या पार पडले होते.आत्ता पुन्हा शिवसेना स्टाईल मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या शाखाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. २०२६ च्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत कर्जमाफीस पात्र असलेल्या, तसेच अनेक वर्षांपासून संबंधित बँकेतून पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ त्यांचे गाव बँकेचे दत्तक गाव नसल्याने नवीन पीककर्ज नाकारले जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
आधीच पावसाच्या खंडामुळे खरीप हंगामातील पिके वाळून जाऊन कोराडा दुष्काळ पडला असून शेतकरी न भुतो न भविष्यते अशी बिकट आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत पीककर्जाचा आधार नाकारला जात असल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक तसेच मानसिक ताण वाढत असल्याचे महेश पाटील यांनी म्हटले आहे.कर्ज माफीस पात्र असलेल्या आणि अनेक वर्षांपासून बँकेशी व्यवहार करणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ गाव दत्तक नसल्याचे कारण देऊन पीककर्जापासून वंचित ठेवू नये.
पात्र शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, या मागणीची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही न झाल्यास २१ सप्टेंबर रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया, देगलूर शाखेसमोर टाळे ठोकून निदर्शने करण्यात येतील आणि आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा स्पष्ट इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ प्रमुख पांडुरंग पाटील थडके देगावकर, शिवसेना देगलूर शहर प्रमुख भगवान जाधव, शिवसेना शहर संघटक मष्णाजी पैलावार, युवा सेना शहर समन्वयक संतोष कांबळे, तमलूरचे सरपंच संतोष मांडे, वन्नाळी येथील माजी सरपंच रमेश पाटील वन्नाळीकर, वन्नाळीचे से.स.सोसायटीचे चेअरमन यशवंत पाटील, शेळगावचे युवा कार्यकर्ते बालाजी पारसेवार, लख्खा चे शिवसेना शाखाप्रमुख शेंबाळे आदींची उपस्थितीत होते.








