कोयत्याचा धाक दाखवून इलेक्ट्रिक मोटर व केबल चोरी करणाऱ्या चोरट्यासह विकत घेणारा राहुरी पोलिसांकडून गजाआड
दिनेश गायकवाड | राहुरी
दिनांक १८ / ०९ / २०२६ / टाकळीमिया येथील शेतकरी अनिकेत जगन्नाथ सगळगिळे हे पहाटेच्या सुमारास शेतात गेले असता त्यांच्या शेतात चार चोरटे विहिरीजवळ इलेक्ट्रिक मोटर व केबल चोरी करत असताना कुणीतरी विहिरीकडे येत असल्याचे पाहून चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या शेतातील विहिरीत असलेली पाणबुडी मोटार व केबल बळजबरीने चोरून नेल्याप्रकरणी राहुरी पोलीस स्टेशनला गुरनं. 1050/2026 भारतीय न्याय संहिता कलम 309(4),317(2) प्रमाणे दिनांक 14/09/2026 रोजी दाखल करण्यात आला. शेतकऱ्यांसह टाकळीमिया गावातील इतर शेतकऱ्यांनी चोरट्यांवर पाळत ठेवून अजय बाबूलाल जाधव यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्यावर पोलिसांनी पोलीस खाक्या दाखवताच अजय जाधव याचे त्याचा साथीदार दादा निकम, सचिन सोनवणे, बॉक्सर यांच्यासह इलेक्ट्रिक मोटर व केबल चोरी करून चोरलेला मुद्देमाल रमेश जालिंदर गोसावी यास विकल्याची कबुली दिल्याने रमेश जालिंदर गोसावी यास अटक करण्यात आली असून गुन्ह्यात फरार झालेला आरोपी बॉक्सर उर्फ सिकंदर दगडू शेख राहणार टाकळीमिया या स अटक करण्यात आली आहे. आरोपीने इतरही ठिकाणी चोरी केलेल्या दोन इलेक्ट्रिक मोटर व केबल पोलिसांनी जप्त केले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि. राजू जाधव, पोकॉ. गणेश लिपने करत आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. मुमक्का सुदर्शन साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाकचौरे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयदत्त भवर साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांचे नेतृत्वात पोउपनि. राजु जाधव , पोहेकॉ. हनुमंत आव्हाड, पोहेकॉ. प्रवीण बागुल, पोहेकॉ. संदीप रोकडे, पोहेकॉ. शकूर सय्यद, पोकॉ. गणेश लिपणे, पोकॉ. अंकुश जाधव , पोकॉ. प्रमोद ढाकणे , पोकॉ. सतीश कुऱ्हाडे, नदीम शेख पोकॉ. शेषराव कुटे यांच्या पथकाने केली.








