खरेदी विक्री संघ मुखेडच्या संचालकपदी माधवराव पाटील उंद्रीकर यांची निवड
पोलीस पाटील वादे दाम्पत्याकडून स्वगृही सत्कार.
मुखेड प्रतिनिधी | मनोज बिरादार
मुखेड तालुक्यातील खरेदी विक्री संघाच्या संचालकपदी उंद्री येथील ज्येष्ठ शेतकरी नेते श्री. माधवराव पाटील उंद्रीकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार पोलीस पाटील सौ. सविता विजयकुमार वादे यांच्या निवासस्थानी करण्यात आला.
हा सत्कार पोलीस पाटील विजयकुमार वादे व गावचे जावई श्री सतीशराव टेंगटोल रावीकर (हल्ली मुक्काम देहूगाव) यांच्या हस्ते करण्यात आला. पुष्पहार, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी नरसिंग लक्ष्मणराव वादे, नारायण पाटील वडजे, गोपाळ पाटील बिरादार, सुभाष आप्पा स्वामी, हानमंत रेवबा शिरगिरे, शंकर गुरुजी पंदनवाड, तेजेराव शिरगिरे, रमेश पा. सूर्यवंशी, बाबू पंदनवाड, व्यंकट पंदनवाड, बालाजी कनंजे, पिराजी सुसकिरे, पत्रकार मनोज पाटील बिरादार, पत्रकार मारोती पाटील वडजे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माधवराव पाटील उंद्रीकर हे गेली अनेक वर्षे शेती व सहकार क्षेत्रात कार्यरत असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ते नेहमी अग्रभागी राहिले आहेत. त्यांच्या निवडीबद्दल गावातून आनंद व्यक्त होत असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.








