बीड बायपास रोडवर टिप्पर आणि बोलेरोचा भीषण अपघातात, पाच जखमी तर एक गंभीर जखमी…
बीड | कुलदीप गायकवाड
बीड शहराजवळील महालक्ष्मी चौक ते संभाजी राजे चौक बायपास मार्गावरील पांगरबावडी ब्रिज जवळ शनिवारी (दि. १९) सकाळी सुमारे ९ वाजता टिप्पर आणि बोलेरोची भीषण धडक झाली. या अपघातात बोलेरोमधील पाच जण जखमी झाले असून, त्यापैकी नंदा बडे यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथील कुटुंबीय बोलेरोने अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला.
बोलेरो गाडी ही बीड बायपास रोड वरील पांगर बावडी ब्रिज जवळ आली असता अचानक टिप्परने वळण घेऊन बोलेरो गाडीला धडक दिली. बोलेरो गाडीतील प्रवाशांमध्ये शिवकन्या बडे, नंदा बडे, राणी बडे, अभिषेक बडे आणि गायत्री कनचरे यांचा समावेश असल्याची माहिती आली आाहे.
नंदा बडे या अपघातात बेशुद्ध झाल्या असून त्यांच्यावर बीड शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच घाडगे नामक रूग्णवाहिका
चालकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आाणि
जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले.
टिप्परच्या वेगावर नियंत्रण, कारवाई कधी?
बीड शहरात प्रवेश करणाऱ्या प्रमुख मार्गावर, बीड शहरात टि्पर( हायवा )वाहने भरधाव धावत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही वाहनांवर वाहन क्रमांक स्पष्ट नसल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून होत आहेत. या पार्श्वभूमीवर शहर व परिसरातील टिप्पयर-हायवांची तपासणी करून नियमबाह्य वाहनांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या वाहनांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणांकडून दुर्लक्ष होत आहे का, असा सवाल या अपघातानंतर उपस्थित होत आहे.








