सेवा संकल्प अभियानांतर्गत पारस औष्णिक विद्युत केंद्र येथे आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न
चंदन जंजाळ | बाळापूर
पारस येथे दि. १७ सप्टेंबर २०२६ : महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली राज्य कामगार विमा योजना आयुक्तालयाच्या आदेशानुसार राज्य कामगार विमा योजना सेवा दवाखाना, रामदास पेठ, अकोला क्रमांक १ यांच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे.
या अभियानाचा शुभारंभ दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी औष्णिक विद्युत केंद्र, पारस येथे करण्यात आला. वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालय, अमरावती येथील डॉ. आर. एस. गोमासे साहेब, प्रशासन अधिकारी यांच्या हस्ते अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अकोला येथील डॉ. अभिजीत पल्हाडे, दीपक सावरकर, सचिन गवई, नयन साबळे, पुष्कर इंगळे, प्रतीक साहेब तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी डॉ. गोमासे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विमाधारक कंत्राटी कामगारांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. कामगारांची आरोग्य तपासणी करून त्यांना आरोग्यविषयक आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. तसेच तपासणीनंतर आवश्यक औषधांचे वाटप करण्यात आले.
प्रबोधनकार ठाकरे जयंतीनिमित्त कार्यक्रम
याच दिवशी प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास औष्णिक विद्युत केंद्र, पारसचे मुख्य अभियंता मा. श्री. शरद भगत साहेब प्रमुख उपस्थित होते. त्यांच्यासोबत उपमुख्य अभियंता संजय कांबळे साहेब, उपमुख्य अभियंता राजेश गट्टूवार साहेब, अभियंता वैशाली सुषिर कल्याण अधिकारी मॅडम. प्रशांत आगळे साहेब, टाले साहेब, भाकरे साहेब, वैद्यकीय अधिकारी राजेश तायडे साहेब तसेच अधिकारी वर्ग उपस्थित होता.
जयंती कार्यक्रमानंतर सेवा संकल्प अभियान – महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या वतीने उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कामगार विमा योजनेविषयी माहिती देणाऱ्या माहितीपत्रकांचे (पॅम्प्लेटचे) वाटप मुख्य अभियंता श्री. शरद भगत साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कामगारांना कामगार विमा योजनेच्या विविध सुविधा व आरोग्यविषयक बाबींविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमास मोठ्या संख्येने कंत्राटी कामगार बांधव उपस्थित होते.
पॉवर फ्रंट कंत्राटी कामगार युनियनच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार
यावेळी एम.एस.ई.बी. वर्कर्स युनियन (पॉवर फ्रंट) कंत्राटी कामगार युनियन, औष्णिक विद्युत केंद्र, पारस या नव्याने स्थापन झालेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा मुख्य अभियंता शरद भगत साहेब यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. व मुख्य अभियंता शरद भगत साहेबांच सुद्धा संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित
मनोहर पंढरी अवचार अध्यक्ष ,नितेश मनोहर तायडे उपाध्यक्ष
दिनेश श्रीराम डांगे सचिव ,निळकंठ महादेवराव गायकवाड कोषाध्यक्ष , मनोज चौधरी सहकोषाध्यक्ष ,जावेद भाई पठाण सदस्य , नितीन पहुरकर सदस्य , सुभाष कुकडे प्रसिद्धी प्रमुख
तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा अभिनंदन करून संघटनेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
कामगारांच्या आरोग्य, सामाजिक सुरक्षा आणि हक्कांसाठी अशा प्रकारचे उपक्रम महत्त्वपूर्ण असून, कामगार आणि प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने सेवा संकल्प अभियान उपयुक्त ठरत आहे.








