किनवटमध्ये आरोग्य शिबिर संपन्न ..
२८४ रुग्णांची तपासणी; बीपी, शुगरसह रक्त तपासणी व विविध आरोग्य योजनांची माहिती
किनवट प्रतिनिधी | मार्कंडेय सिरमवार
किनवट, : श्रीगणेशा आरोग्याचा आरोग्य अभियान २०२६’ अंतर्गत आज श्री सेवादास गणेश मंडळ, किनवट येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. मा. जिल्हा शल्य चिकित्सक, नांदेड डॉ. संजय पेरके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपजिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज घडसिंग यांच्या निरीक्षणाखाली हे शिबिर पार पडले.
या आरोग्य शिबिरात एकूण २८४ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये रक्तदाब (BP), रक्तातील साखर (Sugar), रक्त तपासणी यासह विविध आजारांबाबत तपासणी करण्यात आली. तसेच आभा कार्ड आणि आयुष्मान भारत गोल्डन कार्ड याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्यविषयक समस्या, प्रतिबंधात्मक उपाय आणि आवश्यक उपचारांबाबत रुग्णांचे समुपदेशनही करण्यात आले.
शिबिराला श्री सेवादास गणेश मंडळाचे अध्यक्ष तथा नगरसेवक अभय भीमराव महाजन तसेच मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि मोठ्या संख्येने गणेश भक्त व लाभार्थी उपस्थित होते.
यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज घडसिंग, डॉ. ढोले, आरोग्य मित्र युसुफ शेख, RKSK समुपदेशक पंकज राठोड, NCD समुपदेशक श्री कृष्णा निरडे यांच्यासह आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी शिबिरासाठी सहकार्य केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी श्री सेवादास गणेश मंडळाचे पदाधिकारी व सदस्य श्याम जाधव, मझर चाऊस, संतोष कनाके, संजय सोनी, रामदेव शर्मा, अनिल राठोड, बालाजी राठोड, संदीप राठोड, शेख आवेस, कपिल राठोड, योगेश जाधव, शेख रहमदिन, शेख सरफराज, रिकेश गोडबोले, साजिद खान, रुपेश देशपांडे, गौरव सोनी, अंश महाजन आदींनी सहकार्य केले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य शिबिरामुळे गणेश मंडळातील सदस्यांसह परिसरातील नागरिकांना एकाच ठिकाणी विविध आरोग्य तपासण्या व शासकीय आरोग्य योजनांची माहिती मिळाली.








