पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ…
राहता शहर प्रतिनिधी | हिना उबाळे
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या यंदाच्या गळीत हंगामाची सुरुवात बॉयलर अग्नी प्रदीपन आणि उसाच्या मोळीची पूजन करून करण्यात आली.
यावेळी माजी मंत्री , अण्णासाहेब मस्के पाटील. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील, कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासह सर्व संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी शेतकरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
घरी थांबा माझा शुभारंभ हा ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्यातील कामगार आणि संपूर्ण साखर उद्योगाची जोडलेल्या प्रत्येक घटकासाठी आनंदाचा आणि महत्त्वाचा क्षण असतो. साखर कारखानदारी समोर अनेक आव्हाने असली तरी शेतकरी, कामगार आणि कारखाना व्यवस्थापनाच्या एकत्रित प्रयत्नातून या अडचणी निर्माण करत सहकार्याची ही वाटचाल पुढे सुरू आहे
यंदा दुष्काळी परिस्थितीच्या आव्हान असतानाही गळे थांबा माझे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी योग्य नियोजन आणि सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. त्यामुळे यंदाचा हंगाम यशस्वी करण्यासाठी संचालक मंडळ आणि कामगार बंधूंनी आवश्यक ते नियोजन करून पूर्ण क्षमतेने काम करावे, असे आव्हान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले, तसेच यंदाचा गळीत हंगाम यशस्वी होण्यासाठी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा ही त्यांनी दिल्या








